शिवाजी नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक बाबूराव मधुकर देशमुख यांना लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहाथ पकडले. देशमुख यांनी एका स्थानिक शाळेच्या विश्वस्ताकडून बेकायदेशीर घुसखोरांविरोधात पोलीस संरक्षण पुरवण्यासाठी तीन लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे.
मुंबई : शिवाजी नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक बाबूराव मधुकर देशमुख (वय ५७) यांना मंगळवारी लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) पकडले. देशमुख यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांना बुधवारी विशेष ACB न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, तक्रारदार हे शिवाजी नगरमधील एका स्थानिक ट्रस्टचे ४१ वर्षीय विश्वस्त आहेत. १५ ऑगस्ट २०२४ रोजी काही व्यक्तींनी बेकायदेशीरपणे शाळेच्या आवारात घुसखोरी केली होती. या घुसखोरांनी गेटचा कुलूप तोडून परिसर ताब्यात घेतला. तक्रारदाराने शिवाजी नगर पोलीस आणि चॅरिटी कमिशनरकडे तक्रार दिली होती, मात्र घुसखोरी थांबवण्यासाठी कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप त्यांनी केला.
तक्रारदाराने ACB ला सांगितले की, निरीक्षक देशमुख यांनी पोलीस संरक्षण देण्यासाठी आणि आरोपींना चॅरिटी कमिशनर कार्यालयाचा अंतिम निर्णय येईपर्यंत पुन्हा परिसरात येऊ न देण्यासाठी तीन लाख रुपयांची लाच मागितली होती.
तक्रार आल्यानंतर, ACB ने मंगळवारी पडताळणी केली. त्यावेळी आरोपी अधिकारी २.५ लाख रुपयांमध्ये तडजोड करण्यास तयार झाले. त्यानंतर सापळा रचण्यात आला आणि देशमुख यांना पहिला हप्ता म्हणून एक लाख रुपये स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. ACB च्या पथकाने देशमुख यांच्या निवासस्थानीही झडती घेतली आहे.
Post a Comment
0 Comments