Type Here to Get Search Results !

Add 1 BY 4 1200 PX By 300 PX

"अ वेडिंग स्टोरी" च्या भयप्रद प्रवासाला ३० ऑगस्ट रोजी सुरुवात...


"अ वेडिंग स्टोरी" च्या भयप्रद प्रवासाला ३० ऑगस्ट रोजी सुरुवात...

पुणे :- आता तयार राहा, एक अशी लग्नकथा अनुभवायला जी "मृत्यू" शब्दालाच नवीन अर्थ देईल. बाउंडलेस ब्लॅकबक फिल्म्स सादर करीत आहे"अ वेडिंग स्टोरी", एक थरारक भयकथा जी ३० ऑगस्ट २०२४ रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.

अ वेडिंग स्टोरी मध्ये प्रीती आणि विक्रम, वैभव तत्त्ववादी आणि मुक्ती मोहन यांच्या भूमिका साकारलेल्या आहेत. लग्नाच्या तयारीत असलेल्या या जोडप्याला अचानक एक भयावह शक्ती पछाडते. मृत्यू आपल्या सर्व भयानकतेसह त्यांच्या मागे लागतो, त्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना त्रास देतो. लग्नाची संपूर्ण आनंदमय वातावरण एका भयंकर नृत्यात बदलते. पण ही दुःस्वप्न केवळ नवरा-नवरीपुरती मर्यादित नसून, त्यांच्या कुटुंबीयांना देखील या वाईट शक्तीचा सामना करावा लागतो. उत्सवाचा रंग एक भयानक संघर्षात बदलतो.

हा चित्रपट कमकुवत हृदय असणाऱ्यांसाठी नाही.
शुभो शेखर भट्टाचार्य यांच्या कलात्मक लेखणीने लिहिलेला आणि त्याचबरोबर विनय रेड्डी यांच्या सोबत निर्माण केलेला हा चित्रपट प्रेक्षकांना जागेवरच खिळवून ठेवेल.

आपल्या कॅलेंडरमध्ये ३० ऑगस्ट २०२४ ची तारीख नक्की करा आणि भयावहतेच्या या प्रवासासाठी तयार राहा. "अ वेडिंग स्टोरी" देशभरातील सिनेमागृहांमध्ये प्रेक्षकांच्या मनात भीती निर्माण करण्यासाठी सज्ज आहे.

Post a Comment

0 Comments