Type Here to Get Search Results !

Add

Add

पुणे महानगरपालिकेच्या घनकचरा विभागाचा मोठा स्कॅम उघड ; वरिष्ठ आरोग्य निरीक्षक मंगलदास माने करतायेत कचरा घेण्यासाठी पैशे गोळा ? स्टिंग ऑपरेशन मध्ये झाले मोठे प्रकार उघड ?


पुणे महानगरपालिकेच्या घनकचरा विभागाचा मोठा स्कॅम उघड ; वरिष्ठ आरोग्य निरीक्षक मंगलदास माने करतायेत कचरा घेण्यासाठी पैशे गोळा ? स्टिंग ऑपरेशन मध्ये झाले मोठे प्रकार उघड ?

पुणे :- पुणे महानगरपालिकेचा काम सुरळीत चालू असताना, शहरात एक धक्कादायक प्रकार आमच्याहाथी लागला आहे. पुणे महानगरपालिकेतील कोंढवा येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयात घनकचरा विभागात कार्यरत असलेले वरिष्ठ आरोग्य निरीक्षक मंगलदास माने थेट कचरा देणाऱ्यांकडून पैसे गोळा करत असल्याचे व्हिडिओ फुटेज टाईम्स ऑफ महाराष्ट्राच्या हाथी लागले आहेत. यामध्ये अनेक हॉटेल धारक, जूस सेंटर धारक, बेकरी धारक आणि स्नॅक्स सेंटर चालक यांच्याशी बातचीत केली असता त्यांनी सांगितले की, दर महिन्याला त्यांच्याकडून कोणाकडून 1 हजार रुपये, 800 रुपये,  700 रुपये आणि 500 रुपये अशा वेगवेगळ्या रकमेचे पैसे घेतले जातात त्यानंतरच त्यांचा कचरा पुणे महानगरपालिकेच्या गाडीत घेतला जातो. या सोबतच कामर्सिल कंपनीचा कचरा याचा रेट वेगळा आहे. या बाबतीत एका कोंढव्यात असलेले डीमार्ट येथील एका व्यक्तीने सांगितले की येथील कचरा घेण्यासाठी 20000 रुपये इतका घेतला जातो. याबाबत आम्ही आमच्या प्रतिनिधींच्या माध्यमातून स्टिंग ऑपरेशन करत असताना थेट नागरिकांकडून याची माहिती मिळाली आहे. याचा नागरिकांनी संताप व्यक्त करत सर्व गोष्टींचा उलगडा केला आहे. हा खूप मोठ्या प्रमाणावर स्कॅम चालू असून महिन्याला कमीत कमी 10 लाखांची अफरातफर होत असल्याची माहिती टाईम्स ऑफ महाराष्ट्र न्युज च्या हाथी लागली आहे. अशा मुजोर अधिकाऱ्यांवर बडतर्फाची कारवाई होणे अपेक्षित आहे. 

                      👇👇  पहा व्हिडीओ 👇👇



तसेच हे पैसे कसे गोळा होतात याबाबत माहिती घेतली असता मंगलदास माने यांच्याकडील असलेले कर्मचारी राजू जाधव आणि स्वप्निल पठारे हे त्यांचे पैसे वसूल करत असल्याचे नागरिकांनी सांगितले आहे.

नागरिकांनी केला संताप व्यक्त...

याबाबत कोंढवा येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील नागरिकांनी याबाबत संताप व्यक्त केला आहे आणि लवकरच सर्व नागरिक पुणे महापालिकेच्या आयुक्तांना माने यांच्या कारवाई होण्यासाठी निवेदन देखील देणार असल्याचे माहिती हाती लागली आहे.

आझाद समाज पार्टी करणार मंगलदास माने विरोधात आंदोलन..

तसेच आझाद समाज पार्टीचे पुणे शहर युवक अध्यक्ष निखिल भिंगारदिवे यांनी सांगितले की, टाइम्स ऑफ महाराष्ट्रच्या माध्यमातून आम्हाला याबाबतीत कळाले आहे. एवढा मोठा स्कॅन टाइम्स ऑफ महाराष्ट्राच्या प्रतिनिधींनी उघडकीस आणला हे अत्यंत गौरव करणारी बाब आहे. व्यापाऱ्यांकडून होणारी लूट ही अतिशय निंदनीय बाब आहे. पुणे महानगरपालिके कडून कचरा उचलण्यासाठी पैसे आकारले जात नाही. परंतु सदर अधिकारी मंगलदास माने हे नागरिकांना त्रास देण्याचा काम करत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. असे ते करत असतील तर या बाबतीत त्यांना बडतर्फ करण्यासाठी आम्ही पत्र देणार आहोत जर त्यांना बडतर्फ केले नाही तर, आम्ही पुणे महानगरपालिकेसमोर आंदोलन करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

आणखीन एक पुणे महानगरपालिकेला मोठा स्कॅम लवकरच आणणार बाहेर...

आम्हाला काही सूत्रांकडून आणखीन एक मोठे स्कॅम बाबतीत माहिती मिळाली आहे ते देखील काही दिवसांनी बाहेर आणणार आहे. 


क्रमशः


Post a Comment

0 Comments