Type Here to Get Search Results !

पुण्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांचा गोळीबारत मृत्य...

पुण्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांचा गोळीबारत मृत्य...

पुणे :- नाना पेठ भागातील माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावर गोळीबार झाल्याने पुण्यात खळबळ उडाली आहे. आज १ सप्टेंबर रोजी रात्रीच्या वेळी गोळीबार झाल्याने पुण्यात कायदा फक्त नावालाच उरल्याचे दिसत आहे. दिवसेंदिवस पुण्यातील कायदा व सुव्यस्थेची परिस्थिती ढासळताना दिसत आहे. १० ते १५ जणांच्या टोळक्याकडून दुचाकीवरून येत ४ ते ५ राउंड फायरिंग केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, नाना पेठेतील माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या राहत्या घराजवळ गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती आहे. मारेकऱ्यांनी ४ ते ५ राऊंड फायर करत माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. यात गोळी लागल्याने वनराज आंदेकर काही वेळा पूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

वनराज यांच्या मृत्यूमुळे शहरात वातावरण बिघडण्याची दाट शक्यता आहे.

वनराज यांच्यावर घरगुती वादातून हा गोळीबार करण्यात आल्याचे माहिती समोर आले असून बंडु आंदेकर यांचे जावई गणेश कोमकर याने फायरिंग केल्याचे समजते. गणेश कोमकर याने काही वर्षांपूर्वी शिवसेना शहर प्रमुख रामभाऊ पारेख याच्यांवर अँसिड हल्ला केला. दरम्यान आंदेकरची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.

Post a Comment

0 Comments