पुणे,दौंड: दौंड प्रतिनिधी ( संघराज गायकवाड मयूर साळवे) रावणगाव (ता. दौंड) येथील शेतकरी दादासो निवृत्ती आटोळे (वय ४७) यांची १६,४६,२४२ रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याप्रकरणी अनिल आत्माराम भिल (रा. नांदखुर्द, ता. एरंडोल, जि. जळगाव) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. भा.द.वि. संहिता कलम ३१८(४) अंतर्गत हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
फिर्यादीनुसार, १८ मार्च २०२३ ते ८ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत आरोपीने दौंड शुगर साखर कारखाना, आलेगाव येथे ऊसतोड मजूर पुरवणे आणि ट्रॅक्टर टोळीमार्फत ऊसतोडणी व वाहतुकीचा करार केला. यासाठी फिर्यादीकडून १६,४६,२४२ रुपये घेतले. मात्र, आरोपीने करारानुसार मजूर पुरवले नाहीत किंवा पैसे परत केले नाहीत. वारंवार मागणी करूनही आरोपीने पैसे देण्यास टाळाटाळ केल्याने फिर्यादीने पोलिसांत तक्रार दाखल केली.
हा गुन्हा पोलीस नाईक रोटे यांनी दाखल केला असून, तपास ग्रेड पोलीस स.ई. कुंभार करत आहेत. पोलिसांनी आरोपीविरुद्ध पुढील कारवाई सुरू केली आहे.
👆👆👆 Advertisement 👆👆👆
Post a Comment
0 Comments