दौंडमध्ये गोमांस प्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल...
दौंड (प्रतिनिधी संघराज गायकवाड, मयुर साळवे):- दौंड शहरातील खाटीक गल्ली येथे २९ एप्रिल रोजी सकाळी ६:३० वाजण्याच्या सुमारास अवैध गोमांस साठवणुकीच्या घटनेत सात जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.गोरक्षक यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, पोलिसांनी घटनास्थळी छापा टाकला. यावेळी १२,००० किलो गोमांस (किंमत २,१६,००० रुपये), दोन धारदार सत्तुर (किंमत ४०० रुपये) आणि दोन लोखंडी वजनकाटे (किंमत ७५० रुपये) जप्त करण्यात आले. एकूण २,१७,१५० रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला.
पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळी मांसाची पाहणी करून सॅम्पल तपासणीसाठी घेतले. आरोपी आसिफ कासम कुरेशी, शाहरुख शरिफा कुरेशी, अकिल बाबु कुरेशी, वाइद बाबु खान, आलम मुस्कान शेख, नितीन उचाप्पा गायकवाड आणि आजीम कुरेशी यांच्याविरुद्ध भा.द.वि. संहिता कलम ३२५, ३(५) आणि प्राणी छळ प्रतिबंधक अधिनियम १९६० च्या कलम ५(क), ९(अ), ९(ब) अंतर्गत गुन्हा दाखल झाला. तपास पोलीस हवालदार निखील जाधव करत असून, पोलीस हवालदार किरण राउत यांनी गुन्हा दाखल केला. पोलिस पुढील तपास करत आहेत. अशी माहिती दौंड पोलीस स्टेशनकडून प्राप्त झाली आहे.
Post a Comment
0 Comments