अकबर ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून OYO हॉटेल बुकिंग केल्यानंतर ग्राहकाची फसवणूक? मध्यरात्री 2 वाजता पुण्यातील व्यक्तीला फिरावे लागले जयपूर मध्ये दुसरे हॉटेल शोधत!
पुणे – जयपूर येथे पर्यटनासाठी जयपूरला गेलेल्या एका प्रवाशाची अत्यंत धक्कादायक फसवणूक झाली असून, अकबर ट्रॅव्हल्स अॅपद्वारे केलेल्या ओयो हॉटेल बुकिंगनंतरही त्या प्रवाशाला हॉटेलमध्ये प्रवेश नाकारण्यात आला. सर्व रक्कम ऑनलाईन भरूनही हॉटेलकडून अतिरिक्त पैसे मागितले गेले, आणि नंतर अकबर ट्रॅव्हल्सकडून कोणतीही मदत न मिळाल्याने संबंधित प्रवाशाला मध्यरात्री रेल्वे स्टेशनवर परत जावे लागले.
एम ए शेख असे या प्रवाशाचे नाव असून, त्यांनी दिनांक 21 एप्रिल 2025 रोजी जयपूर येथील 'ओ सालासर हॉटेल' या ओयो अॅफिलिएट हॉटेलचे बुकिंग अकबर ट्रॅव्हल्स अॅपवरून केले होते. संबंधित बुकिंगसाठी संपूर्ण रक्कम आधीच अॅपवरून भरली होती. शेख यांचे बुकिंग आयडी होता – AO250288876.
ते जयपूर रेल्वे स्टेशनला मध्यरात्री 1 वाजता पोहोचले आणि स्टेशनवरून सुमारे 7-8 किलोमीटर अंतरावरील हॉटेलपर्यंत प्रवास करताना 130 रुपये खर्च करून गेले. मात्र हॉटेलवर पोहोचल्यावर, व्यवस्थापनाने त्यांच्याकडून अतिरिक्त 565 रुपये मागिणी केली.त्यावर शेख यांनी स्पष्ट सांगितले की, बुकिंग आधीच आम्ही पूर्ण ऑनलाईन पेमेंटसहित बुकिंग झालेले आहे. मात्र हॉटेल कर्मचाऱ्यांचे वागणे उद्धट आणि संशयास्पद होते.
हॉटेल व्यवस्थापकाने कोणतीही रसीद किंवा बिले देण्यास नकार दिला. यामुळे शेख यांनी तत्काळ अकबर ट्रॅव्हल्सच्या कस्टमर केअरशी 8291120318 या क्रमांकावर संपर्क साधला. त्यांनी तक्रार स्पष्ट केली असता, कस्टमर केअर प्रतिनिधीने सल्ला दिला की, 'तुम्ही अतिरिक्त रक्कम भरा, नंतर आम्ही ती रिफंड करू'. मात्र त्याचे invoice घ्या. मात्र हॉटेल कर्मचाऱ्यांच्या वर्तनामुळे आणि कोणतीही लेखी खात्री तसेच invoice आणि बिल न देत असल्यामुळे, शेख यांनी तिथे न थांबता परत जयपूर स्टेशन गाठले.
रात्री 2:45 वाजता त्यांनी जयपूर स्टेशन जवळ असलेले 'मंगल हॉटेल' नावाच्या दुसऱ्या हॉटेलमध्ये 6 तासांसाठी 1000 रुपये भरून मुक्काम केला. त्यावेळेपर्यंत त्यांना खूप जास्त प्रमाणात शारीरिक आणि मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले. सर्व प्रकाराचा व्हिडीओ, फोटो आणि पुरावे त्यांनी रेकॉर्ड केले. यामध्ये हॉटेलमधील 'अभिषेक चौधरी' नावाच्या कर्मचाऱ्याशी झालेला संवादही समाविष्ट आहे.
त्यानंतर शेख यांनी या प्रकाराबाबत 22 एप्रिल रोजी पुन्हा एक ईमेल करून जयपुर पोलिसांना ट्विटरवर सुद्धा तक्रार केली. त्यात त्यांनी पुरावे जोडून ट्विटर स्क्रीनशॉट आणि कॉल लॉगही सादर केला. तरीसुद्धा, आजतागायत अकबर ट्रॅव्हल्सकडून कोणताही प्रतिसाद आलेला नाही.
या प्रकारानंतर अकबर ट्रॅव्हल्सकडून आलेले सुरुवातीचे उत्तर अधिकच धक्कादायक ठरले. त्या मेलमध्ये लिहिले होते – “गेस्ट डिड नॉट अरायव्ह फॉर चेक इन.” म्हणजेच ग्राहक हॉटेलवर आला नव्हता, असा थेट दावा करण्यात आला. हा दावा OYO चा अली आणि हॉटेल व्यवस्थापक सुभाष यांच्या म्हणण्यावर आधारित असल्याचे नमूद करण्यात आले.
मात्र ग्राहकाने दिलेल्या फोटो, व्हिडीओ, प्रत्यक्ष भेट झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव, फोन कॉल्स – हे सर्व पुरावे पाहता, हॉटेल प्रशासन आणि ट्रॅव्हल प्लॅटफॉर्म यांच्यामधील संबंधांबाबत गंभीर प्रश्न निर्माण होतो. ग्राहक प्रत्यक्ष हजर असूनही त्याचे अस्तित्व नाकारणे आणि नंतर संवाद बंद ठेवणे, हा प्रकार केवळ बेजबाबदारपणा नसून प्रवाशाच्या सुरक्षिततेशी खेळण्यासारखा आहे.
हा प्रकार एकट्या शेख यांच्यापुरता मर्यादित राहिलेला नाही, तर ऑनलाईन ट्रॅव्हल अॅप्स आणि बजेट हॉटेल साख्यांमधील पारदर्शकतेच्या अभावामुळे अनेक प्रवासी फसवले जात असल्याचे दाखवून देतो.
Post a Comment
0 Comments