Type Here to Get Search Results !

Add 1 BY 4 1200 PX By 300 PX

Pune Metro News: पुणेकरांचा प्रवास होणार इन टाइम; मुख्य शहराशी वाढणार कनेक्टिव्हिटी हडपसर आणि कोंढव्याला नवीन मेट्रो मार्गिका

 

Pune :- पुणेकरांचा प्रवास अधिक सुखकर होणार आहे. या मेट्रो मार्गिकांमुळे हडपसर मतदारसंघात मेट्रो जाळे पसरणार आहे. हडपसर विधानसभा मतदारसंघात सिव्हील कोर्ट ते कोंढवा बुद्रुक व खुर्द, येवलेवाडी मेट्रो मार्गास मंजुरी मिळालीय.

याचबरोबर हडपसर सासवड रोड, हडपसर लोणी काळभोर देखील मार्गिका मंजूर झालीय. या मेट्रो मार्गामुळे हडपसरहून मुख्य शहराशी कनेक्टिव्हिटी वाढलीय. नागरिकांचा प्रवास सुखकर आणि वेगाने होणार आहे.

विधानभवन येथील झुंबर हॉलमध्ये महाराष्ट्र मेट्रो रेल कार्पोरेशनची बैठक पार पडली. या बैठकीत या मार्गिकासंदर्भात निर्णय घेण्यात आलाय. उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवारांच्या सूचनेनुसार हडपसरसाठी नवीन मेट्रो मार्गिका मंजूर झाल्या. या बैठकीत हडपसर मतदारसंघाचे आमदार चेतन तुपे देखील होते. पुणे शहराचा एकत्रित वाहतूक आराखडा बनवण्याचे काम सध्या अंतिम टप्प्यात आहे.

याबाबत या आराखड्यामध्ये नवीन मेट्रो मार्ग आणि त्याची व्यवहार्यता यासंबंधी शक्यतांचा विचार केला जात. जेणेकरून येत्या काही वर्षात शहरातील कशाप्रकारे वाहतूक वाढ होईल. ही वाहतूक कोणत्या भागांमध्ये असेल अशा एकूण माहितीचे संकलनदेखील या बैठकीत करण्यात येत आहे. या मार्गिकासंदर्भात आमदार तुपे यांनी माहिती दिलीय.

शहरातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होतेय. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय. मेट्रो मार्गिकांमुळे खडकवासला ते लोणीकाळभोर, कात्रज, हडपसर मार्गे खराडी तर दुसरीकडे सासवड रोड (फुरसुंगी) पर्यंत कनेक्टिव्हिटी मिळेल. निवडकीच्या वेळी मतदारांना मतदारसंघात मेट्रोचे जाळे निर्माण केले जाईल, असं वचन दिलं होतं, ते पूर्ण होतंय. बैठकीत केलेल्या सूचना मान्य करण्यात आल्यात.

असा असेल मार्ग

पुलगेट ते कात्रज आणि हडपसर ते सासवड अशा दोन मार्गिका वाहतूक आराखड्यासाठी सुचविण्यात आल्या होत्या. कात्रज ते कोंढवा बु, खडी मशीन चौक, कोंढवा खुर्द, लुला नगर मार्गे पुलगेट असे असा मार्ग असणार आहे. तर हडपसर ते लोणीकाळभोर, हडपसर ते सासवड रस्ता, फुरसुंगी स्टेशनपर्यंत असा दुसरा मार्ग असणार आहे.

पुणे मेट्रो फेज २ प्रकल्पाला मंजुरी

पुणे मेट्रोपॉलिटन रिजन डेव्हलपमेंट ॲथॉरिटीकडून पुणे मेट्रो स्टेशन प्रकल्प केला जाणार आहे. शिवाजीनगर ते लोणी काळभोर आणि खडकवासला ते खराडीपर्यंत विस्तारित करण्याची योजना आखलीय. पुणे मेट्रो फेज २ प्रकल्पांतर्गत इतर विविध मार्गांनाही मंजुरी देण्यात आलीय.

शिवाजीनगर ते लोणी काळभोर: पीएमआरडीए हिंजवडी ते पुण्यातील शिवाजीनगर मेट्रो स्थानकापर्यंत विस्तारित करणार आहे. या मार्गाचा लोणी काळभोरपर्यंत विस्तार करण्याची योजना आहे. पुढील विस्तारित मार्गामध्ये सासवड रोडवरील संभाव्य शाखा असलेल्या शिवाजीनगर, पुलगेट, हडपसर आणि लोणी काळभोर यासह अनेक महत्त्वाच्या ठिकाणांचा समावेश असेल.

Post a Comment

0 Comments