Type Here to Get Search Results !

Add 1 BY 4 1200 PX By 300 PX

Delhi Elections :- दिल्ली पोलीस लोकांना मतदान करण्यापासून रोखत आहेत", सौरभ भारद्वाज यांचा आरोप

 

Delhi Elections 2025 : दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान सुरू आहे. सकाळपासूनच मतदारांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे. तसेच, कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. अशातच दिल्लीचे मंत्री सौरभ भारद्वाज यांनी पोलिसांवर आरोप केला आहे.

दिल्ली पोलीस चिराग दिल्लीतील मतदान केंद्रावर लोकांना मतदान करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करत आहेत, असे सौरभ भारद्वाज यांनी म्हटले आहे.

प्रसार माध्यमांशी बोलताना दिल्लीचे मंत्री सौरभ भारद्वाज म्हणाले, "निवडणुकीवर परिणाम करण्यासाठी दिल्ली पोलिसांनी जागोजागी बॅरिकेड्स लावले आहेत. बॅरिकेड्स का लावले आहेत? दिल्ली पोलिसांच्या कोणत्या वरिष्ठ अधिकाऱ्याने त्यांना बॅरिकेड्स लावण्यास सांगितले आहे? हे सर्व गरिबांना त्रास देण्यासाठी केले जात आहे. जिथे जिथे आपचा बालेकिल्ला आहे, तिथे मालवीय नगरचे एसीपी आणि एसएचओ हे सर्व उघडपणे करत आहेत."

याचबरोबर, "काल रात्री एसएचओने आमच्या खाजगी जागेवरही छापा टाकला. येथे २१,००० लोकांनी मतदान केले. चिराग दिल्लीतील सर्व १७-१८ मतदान केंद्रांवर पोलीस असे करत आहेत. लोक मतदान करण्यासाठी मेट्रोने किंवा रस्त्याने येऊ शकत नाहीत. वीरेंद्र सचदेवा किंवा राष्ट्रपती मुर्मू या मतदान केंद्रापासून २०० मीटर अंतरावर गाडीतून खाली उतरले का? कोणतीही मार्गदर्शक तत्त्वे नाहीत", असेही सौरभ भारद्वाज म्हणाले.

दरम्यान, सौरभ भारद्वाज यांनी केलेल्या आरोपांना डीसीपी अंकित चौहान यांनी उत्तर दिले आहे. डीसीपी म्हणाले, "वृद्ध आणि ज्यांना चालता येत नाही, त्यांना सूट दिली आहे. त्यांना त्यांच्या गाड्या आत आणण्याची परवानगी आहे. हा नियम सर्वत्र अंमलात आणला जात आहे. ते (सौरभ भारद्वाज) ज्या ठिकाणी सांगत आहेत, त्या ठिकाणांची आम्ही चौकशी करू."

राजधानी दिल्लीत आज विधानसभेच्या ७० जागांसाठी मतदान होत आहे. सायंकाळी ६ वाजेपर्यंत हे मतदान होणार आहे. तर या निवडणुकीचे निकाल ८ फेब्रुवारीला शनिवारी जाहीर केला जाणार आहे. मतदान किती होते त्यावर निकालाचे गणित अवलंबून आहे. राजधानीत एकूण एक कोटी ५६ लाख मतदार आहेत.

Post a Comment

0 Comments