पुणे : राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या (अजित पवार गट) केंद्रीय कार्य समितीच्या सदस्यपदी जावेद इनामदार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, महासचिव अविनाश आदिक यांच्या मान्यतेने राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीची घोषणा राष्ट्रीय युवक अध्यक्ष धीरजभैय्या शर्मा यांनी केली.
जावेद इनामदार यांच्यासह राष्ट्रवादी युवक काँग्रेस महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदी सुरज चव्हाण, जिलानी शेख, जानकी पांडे, बिष्णु दास यांचा केंद्रीय कार्य समितीमध्ये समावेश आहे. धीरजभैय्या शर्मा यांनी जावेद इनामदार यांच्या नियुक्तीचे पत्र दिले व त्यांचे अभिनंदन करून पक्षवाढीसाठी काम करण्यास शुभेच्छा दिल्या.
जावेद इनामदार म्हणाले, "माननीय अजित पवार यांच्या मार्गदर्शनात व धीरजभैय्या शर्मा यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून आजवर काम केले आहे. विकासाच्या वाटेने चालणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला युवकांमध्ये ताकदीने घेऊन जाण्याचा प्रयत्न यापुढील काळात करणार आहे. पक्षाला जनमानसात रुजवण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे."
Post a Comment
0 Comments