अभिनेते देवगिल यांनी तत्कालीन पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या नावाचा वापर करून करोडोंची केली आर्थिक फसवणूक? आणखीन पोलीस व पुणे महापालिकेचे अधिकारी यामध्ये सहभागी असण्याची शक्यता...
Special Investigation Report By Times Of Maharashtra News Exclusive
पुणे :- प्रसिद्ध अभिनेते देव गिल यांच्याकडून चालविल्या जाणाऱ्या देव गिल प्रोडक्शनने एक मोठा आर्थिक गोंधळ उभा केला आहे, ज्यामुळे अनेक निर्मात्यांना आर्थिक फसवणुकीचा सामना करावा लागत आहे. त्यांच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या "अहो विक्रमार्का" या मराठी सिनेमाने या प्रकरणाला अधिक ताप दिला आहे.
या सिनेमासाठी आरती देविंदर गिल, मिहिर कुलकर्णी, आणि अश्विनी कुमार मिश्रा यांसारख्या प्रमुख निर्मात्यांनी भूमिका बजावली आहे. तर श्रीकृष्ण गोसावी, एक सह-निर्माता, यांनी १ करोड १७ लाख रुपये या सिनेमासाठी गुंतवले आहेत. या गुंतवणुकीच्या बदल्यात त्यांना प्रॉफिटमध्ये ३ टक्के शेअर देण्यात येईल असा करार झाला होता. परंतु, पुढील मिटींगमध्ये देव गिल यांच्या टीमने अचानक ४ टक्के शेअर मिळतील असा संदेश दिला.
सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर श्रीकृष्ण गोसावी यांना प्रॉफिट विषयी काहीही माहिती दिली गेली नाही. त्यांच्यासोबत अनेक वेळा संवाद साधण्याचा प्रयत्न केला गेला, पण देव गिल यांच्याकडून येणारी उत्तरे सतत टाळाटाळ करणारी होती. गोसावी यांनी सांगितले की, "सिनेमाने किती पैसे कमावले, हे जाणून घेणे आमचे हक्क आहे. पण देव गिल आणि त्यांच्या टीमने कोणतीही माहिती देण्यास तयार नव्हती."
अधिक माहिती घेण्यासाठी, गोसावी यांनी देव गिल यांना संपर्क केला, पण प्रत्येक वेळी त्यांना निराशा हाथी मिळाली. या प्रकरणात देव गिल यांनी ३० कोटी रुपयांच्या बजेटचा उल्लेख केला होता, परंतु प्रत्यक्षात कमी खर्च केले गेले असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे, माजी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता हे देखील देव गिल यांचे बिझनेस पार्टनर असल्याचे देव गिल यांच्या कडून सांगण्यात आले होते.
त्यांच्या नावाचा तसेच अनेक पोलीस अधिकाऱ्यांचा नावांचा वापर करून अनेक निर्मात्यांना गंडा घातले असल्याची शक्यता आहे. या प्रकरणात १७ सहनिर्माते असल्यामुळे, अन्य निर्मात्यांना देखील अशाच प्रकारची फसवणूक झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पुणे मनपाचे उपायुक्त माधव जगताप यांनीही देव गिल यांची भेट घेऊन त्यांच्या चित्रपटाला शुभेच्छा दिल्या होत्या. त्यांचाही काही सहभाग यांच्या बरोबर आहे का याबाबत तपास सुरू आहे.
श्रीकृष्ण गोसावी यांना विश्वास आहे की, हे सर्व प्रकरण एक मोठा आर्थिक घोटाळा आहे, ज्यामध्ये अनेक निर्मात्यांच्या आर्थिक हितांचं उल्लंघन झालं आहे. “आम्हाला कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही आणि हा विश्वासघात आणि फसवणूक आहे,” असे गोसावी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे.
देव गिल यांच्याकडून निर्मात्यांना अद्याप काहीही स्पष्टीकरण मिळालेले नाही. अशा परिस्थितीत, या प्रकरणाचे गंभीर परिणाम होऊ शकतात, कारण या प्रकरणात गुंतलेल्या अनेक निर्मात्यांचा विश्वास संपला आहे. सिनेमा उद्योगात पारदर्शकता आवश्यक असल्याने, या प्रकरणाची चौकशी केली जाण्याची मागणी जोर धरत आहे.
यामध्ये, निर्माता व सह-निर्मात्यांनी एकत्र येऊन आपल्या हक्कांच्या संरक्षणासाठी कायदेशीर उपाययोजना करण्याची शक्यता आहे. कारण या प्रकरणात स्पष्ट फसवणूक झालेली असल्याने, बऱ्याच जणांना आपल्या गुंतवणुकीचा परतावा मिळवण्यात अडचण येऊ शकते.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे, या प्रकरणाने सिनेमा उद्योगात आपली प्रतिमा सुधारण्यासाठी आणि यासारख्या घटनांना आळा घालण्यासाठी आवश्यक असलेल्या धोरणांचा विचार करणे आवश्यक आहे. यामुळे भविष्यकाळात निर्मात्यांचा विश्वास वाढवला जाईल आणि सिनेमा क्षेत्रात आर्थिक पारदर्शकतेसाठी एक चांगला वातावरण निर्माण होईल.
या प्रकरणावर पोलिस आयुक्तांचे प्रामुख्याने लक्ष?
या प्रकरणाबाबत पोलिसांकडून माहिती घेतली असता अशी माहिती हाती लागली की या प्रकरणात स्वतः पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार हे या प्रकरणाची गंभीररीत्या चौकशी करत असून सर्व पोलिसांना निर्देश दिले आहे की, यामध्ये कोणतेही अधिकारी असले त्यांचा या प्रकरणात काहीही संबंध दिसून आला तर, ते मागेपुढे पाहणार नसल्याचं माहिती गोपनीय सूत्रांकडून मिळाली आहे.
या प्रकरणात आमची संपूर्ण आर्थिक गुन्हे शाखेची टीम अत्यंत काटेकोरपणे तपासाचे काम करत आहे. देव गिल आणि गोसावी यांचा जबाब झालेला आहे. अधिक तपास सुरू आहे. जे कागदपत्र आमच्या हाती लागले आहे आणि गोसावी यांच्याकडून देण्यात आलेले आहेत त्याची पडताळणी सुरू आहे. या प्रकरणात फसवणुकीचा प्रकार किंवा उद्देश असल्यास पुढील कायदेशीर कारवाई योग्यरीत्या करण्यात येईल
विवेक माशाळ , पोलीस उपायुक्त
आर्थिक गुन्हे शाखा पुणे शहर पोलीस
भाग १
क्रमशः
पुढच्या भागात कोण कोण अधिकारी या मध्ये देव गिल यांना मदत करत होते त्यांची नावे करणार जाहीर...
Post a Comment
0 Comments