Saif Ali khan Operation Bills : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान आज कोणत्या चित्रपटामुळे किंवा इतर कोणत्याही प्रमोशनल कार्यक्रमामुळे नाही तर त्याच्यावर झालेल्या हल्ल्यामुळे चर्चेत आहे.
सैफ अली खान याच्यावर 16 जानेवारी रोजी हल्ला झाला. त्याच्यावर चाकूने 6 वेळा वार करण्यात आले. त्याला मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आता त्याला लवकरच डिस्चार्ज देण्यात येईल असं डॉक्टरांनी सांगितलंय. अशातच त्याची वैद्यकीय विम्याची कागदपत्र लीक झाली आहेत. ज्यामध्ये त्याच्या उपचारासाठी किती पैसे दिले आहेत याची माहिती आहे.
सैफ अली खानने आरोग्य विमा घेतला आहे. लीक झालेल्या कागदपत्रांवरून असे दिसून आले आहे की अभिनेत्याने 35.95 लाख रुपयांचा मेडिक्लेम केला होता. त्यापैकी 25 लाख रुपये आधीच मंजूर झाले आहेत. उर्वरित खर्च सैफलाच करावा लागणार आहे. याशिवाय, या दस्तऐवजात अभिनेत्याचा सदस्य आयडी, त्याला कोणते उपचार मिळाले त्याला कधी डिस्चार्ज दिला जाईल यासारखे काही तपशील देखील आहेत.
लिलावती रुग्णालयाचे डॉ. नितिन नारायण डांगे म्हणाले, 'सैफ अली खान याची प्रकृती आता स्थिर आहे. आता तो चालू देखील शकतो. कोणतीच अडचण नाही शिवाय अभिनेत्याला जास्त वेदना देखील होत नाही…' लवकरच रुग्णालयातून सुट्टी मिळेल असं देखील सांगण्यात येत आहे.
अभिनेत्याला आयसीयू मधून नॉर्मल रूममध्ये शिफ्ट करण्यात आलं आहे. सैफच्या प्रकृतीचा अंदाज घेऊन त्याला रुग्णालयातून सुट्टी मिळेल असं देखील सांगण्यात येत आहे. पण अभिनेत्याल दोन आठवडे आराम करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.
सैफ अली खानवरील हल्ल्याला 50 तासांहून अधिक काळ उलटून गेला आहे. मात्र यातील हल्लेखोर पोलिसांच्या हाती लागलेला नाही. मुंबई पोलिसांची तब्बल 35 पथके आरोपीचा मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात शोध घेत आहे. काल रात्रीपासून वांद्रे पोलिस ठाण्यात अश्या दहा ते बारा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले जे या विभागात विनाकारण भटकत होते.तसेच काही सराईत गुन्हेगारांना ही पोलीस ठाण्यात आणण्यात आले होते. त्यांना सिसिटीव्ही फुटेज दाखवून आरोपीची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला जात होता.
Post a Comment
0 Comments