पुणे (Janta Social Foundation) :- जनता सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष नौमान निसार शेख यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने लक्ष्मी नगर, येरवडा येथील अनाथ आश्रमात ७० अनाथ मुलांना खाऊ, जेवण आणि फळांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे आश्रमातील मुले आणि स्टाफ खूप आनंदीत झाले आणि फाउंडेशनच्या कार्याची प्रशंसा केली.
या कार्यक्रमाद्वारे एक महत्त्वाचा संदेश दिला गेला आहे – वाढदिवस साजरा करताना केक, डी जे, आणि डेकोरेशनमध्ये पैसे गुंतवण्याऐवजी गरजवंतांना मदत करणे अधिक महत्त्वाचे आहे. "नेकिया जमा करणे लग जाओ साहब, खबर पक्की है दौलत और शोहरत साथ नहीं जायेंगी," या विचाराने उपस्थितांना प्रेरणा मिळाली.
या उपक्रमात येरवडा पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथुन सावंत, पोलीस उप निरीक्षक अस्लम शेख, तसेच अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. या आयोजनाने सामाजिक एकतेचा संदेश देत गरजवंतांच्या जीवनात आनंद आणण्याचा प्रयत्न केला आहे.
जनता सोशल फाउंडेशनच्या या उपक्रमाने समाजात एक नवा दृष्टिकोन तयार केला आहे, की प्रत्येकाच्या जीवनात सच्चे आनंद आणि समर्पण हेच खरे धन आहे.
यावेळी राष्ट्रवादीचे जावेद इनामदार, जॉर्ज स्वामी, उसैद शेख, जाफर खान, नूर खान, आसिफ इनामदार, उसामा शेख, जकिर शेख, अली शेख, ऐनुल अन्सारी, खालिद पठाण, नितीन साळुंखे, तल्हा शेख, रमजान शेख, शहाजान पटेल, अम्मार शेख, युसुफ अन्सारी, हमझा अन्सारी, रिशाद शेख, अभिजीत साळवे व इतर मान्यवर उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments