पुणे (मुज्जम्मील शेख): महापालिका आयुक्त यांचे आदेशान्वये १६ जानेवारी (गुरुवारी) कोंढवा येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालया अंतर्गत एक मोठी संयुक्त कारवाई राबविण्यात आली. सायंकाळी ४:३० ते ७:३० या कालावधीत व्ही.आय.टी. कॉलेज चौक ते कान्हा हॉटेल परिसरात अतिक्रमण निर्मूलन, अनधिकृत बांधकामांवर कारवाई, प्लास्टिक प्रतिबंधात्मक उपाय आणि परिसर स्वच्छतेसाठी संबंधित विभागांनी एकत्रित कार्यवाही केली.
👇👇 Advertisement 👇👇
👆👆 Advertisement👆👆
सदर कारवाई महापालिका आयुक्ताच्या आदेशानुसार, उप आयुक्त (परिमंडळ क्र. ४) व इतर महापालिका अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली केली गेली. या कारवाईमध्ये अतिक्रमण निरीक्षक, बांधकाम निरीक्षक, आरोग्य निरीक्षक, आकाशचिन्ह व परवाना निरीक्षक आणि स्थानिक पोलीस यांच्यासह एकूण ६७ अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.
कारवाईत ४० काउंटर, २ हातगाडी, ६ सिलेंडर आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले. त्याचबरोबर, घनकचरा व्यवस्थापन विभागाने प्लास्टिक प्रतिबंधक कायद्यानुसार २६ नागरिकांवर २३,७०० रुपये दंड ठोठवला. आकाशचिन्ह व परवाना विभागाने बोर्ड, बॅनर व फ्लेक्सवर कारवाई करत २,००० रुपये दंड वसूल केले.
कारवाईत सहभागी अधिकारी, कर्मचारी आणि उपकरणांचा वापर करून रस्त्यावर व पदपथावर असलेल्या अतिक्रमणांचा निर्मुलन करण्यात आले. कार्यवाहीसाठी १ जे.सी.बी., ४ ट्रक, २ झेनॉन आणि १ भरारी पथक वाहनाचा उपयोग केला गेला.
महापालिकेच्या या कारवाईला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला असून, पुणे शहरातील स्वच्छता आणि अनुशासन कायम ठेवण्यासाठी अशा कारवायांचे महत्त्वाचे योगदान आहे.
सहायक महापालिका आयुक्त लक्ष्मण कादबाने यांची नियुक्ती होऊन अवघे ४ दिवस झाले असता, यांनी आपल्या क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत असलेले परिसरात स्वच्छता मोहीम व अतिक्रमण निर्मूलन कारवाई पार पाडली आहे यांचा सर्व स्तरावरून गौरव करण्यात येत आहे.
Post a Comment
0 Comments