हडपसर पुणे :- काल पुण्यात हडपसर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट) उमेदवार प्रशांत जगताप यांच्या प्रचारासाठी शरद पवार यांची सभा झाली. मात्र, भाषणाच्या शेवटी शरद पवार यांनी चुकून “प्रशांत तुपे” असे नाव घेतले. विशेष म्हणजे, “तुपे” हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाचे उमेदवार चेतन तुपे पाटील यांचे आडनाव आहे.
👇👇 पहा व्हिडिओ 👇👇
👆👆 पहा व्हिडिओ 👆👆
सभेत झालेली ही चूक की संकेत, यावर चर्चा रंगली आहे. राजकीय वर्तुळात आता हा विषय गाजत असून, पवार साहेबांनी चुकून घेतलेले नाव चेतन तुपे यांच्यासाठी सकारात्मक ठरत आहे. त्यांच्या समर्थकांनी याला "पवार साहेबांनी चेतन तुपे यांना अप्रत्यक्ष आशीर्वाद दिला" असे म्हटले आहे.
यामुळे हडपसरच्या निवडणुकीत चेतन तुपे यांची लोकप्रियता वाढत असल्याचे स्पष्ट होत आहे, आणि विरोधकांमध्ये यामुळे अस्वस्थता निर्माण झाली आहे.
Post a Comment
0 Comments