Type Here to Get Search Results !

Add 1 BY 4 1200 PX By 300 PX

महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु

 

पैठण विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार विलास भुमरे हे पाचोड येथील आपल्या निवासस्थानी आज पहाटे भोवळ आल्याने गॅलरीमधून खाली पडले. यात ते गंभीर जखमी झाले आहेत.

त्यांचा डावा हात आणि डावा पाय फ्रॅक्चर झाल्याचे प्राथमिक माहिती आहे.

सध्या विलास भुमरे छत्रपती संभाजीनगर येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. त्यांच्या फ्रॅक्चर झालेल्या हात व पायावर शस्त्रक्रिया होणार असल्याची माहिती आहे. दरम्यान, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण विधानसभा मतदारसंघातून गेल्या पंधरा दिवसापासून ते रात्रंदिवस प्रचार करत आहेत.

विलास भुमरे हे खासदार आणि माजी पालकमंत्री संदिपान भुमरे यांचे पुत्र आहेत. ते पैठणमध्ये महायुतीकडून मैदानात उतरले आहेत.आता ऐन विधानसभा निवडणुकीत दुखापतीमुळे विलास भुमरे यांच्यावर प्रचार बंद करण्याची वेळ आली आहे. विलास भुमरे यांचे पुढील प्रचाराचे नियोजित दौरे रद्द करण्यात आले आहेत.

Post a Comment

0 Comments