Type Here to Get Search Results !

Add 1 BY 4 1200 PX By 300 PX

एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांना माहीत आहे की. महायुतीच्या CM पदाच्या चेहऱ्यावरून ओवेसींचं मोठं विधान...

 

मुंबई : मराहाष्ट्रात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून राजकीय वातारवण जबरदस्त तापले आहे. नेतेमंडळी मुलाखती आणि जाहीर सभा आदींतून एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांचे वार पलटवार करताना दिसत आहेत. यातच एआयएमआयएमचे प्रमुख असदुत्तीन ओवेसी यांनी महायुतीच्या मुख्यमंत्रीपदासंदर्भात मोठे विधान केले आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये एका जनसभेला संबोधित करताना AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवेसी म्हणाले, "आता आपम मुख्यमंत्री होणार नाही, हे एकनाथ शिंदे यांना माहीत झाले आहे. आता आपण येणार नाही, हे देवेंद्र फडणवीसांनाही माहीत झाले आहे. यामुळेच माझे नाव घेऊन हिन्दू-मुस्लीम करत आहेत. हे लोक हिन्दू-मुस्लीम करून समाजात फूट पाडत आहेत."

लाडकी बहीण योजनेवरही भाष्य -
असदुद्दीन ओवेसी म्हणाले, "आता सीएम एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री अमित शाह म्हणत आहेत की, आम्ही लाडक्या बहिणींना 1500 रुपये देत आहोत. हा पैसा तुमचाच आहे. ते आपल्या खिशातून देत नाहीत. भाजपवाले म्हणाले होते, 15 लाख रुपये येतील पण केवळ 1500 रुपये येत आहेत."

याशिवाय मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना, "भाजपवाल्यांनी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर लाठीचार्ज करवला, मात्र आम्ही त्यांच्यासोबत आहोत," असेही ओवेसी यांनी म्हटले आहे.

Post a Comment

0 Comments