कोंढवा पुणे :- हडपसर विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे चेतन तुपे पाटील व महाविकास आघाडीतर्फे शरद पवार गटाचे उमेदवार प्रशांत जगताप यांच्यात रंगतदार सामना पाहायला मिळत आहे. या निवडणुकीत मतदारांसमोर विकासाचा मुद्दा व धर्माच्या नावावर मत मागण्याचा विषय समोर आला आहे.
चेतन तुपे पाटील यांनी मतदारसंघाच्या विकासावर भर देत, आपल्या मोहिमेतून विकासाचा अजेंडा मांडला आहे. ते त्यांच्या कार्यकर्त्यांसह विविध विकास कामांवर मतदारांसोबत संवाद साधत आहेत. कोंढवा परिसरात चेतन तुपे पाटील यांच्या सोबत कोंढवा भागातील माजी नगरसेवक रईस सुंडके, हाजी फिरोज, गफूर पठाण हे व त्यांचे सहकारी नगरसेवक विकासाच्या मुद्द्यावर मतदारांशी चर्चा करत आहेत. त्यांच्या मते, मतदारसंघात रस्ते, पाणी, आणि मूलभूत सोयी-सुविधा यांसारख्या विषयांवर काम करणे हीच खऱ्या अर्थाने लोकांसाठी असलेली जबाबदारी आहे.
दुसरीकडे, महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत जगताप हे धर्माच्या आधारावर मते मागत असल्याचे पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडीचे काही पदाधिकारी धर्माच्या नावावर मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत असल्याचे आरोप झाले आहेत. या निवडणुकीत विकासाच्या मुद्द्यांवर बोलण्याऐवजी धार्मिक मुद्यांवर कोंढवा भगत प्रचार करताना त्यांना व त्यांच्या सहकारी कार्यकर्त्यांना पाहिले गेले आहे.
या निवडणुकीत चेतन तुपे पाटील हे विकासाच्या मुद्द्यावर ठाम राहून मतदारांच्या विश्वासाचे समाजकारण करत आहेत. विकास हीच खरी ताकद असून, हडपसरच्या मतदारसंघाला पुढे नेण्याची तयारी त्यांनी दर्शवली आहे.
Post a Comment
0 Comments