पुणे :- 214, पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा (अ.जा) मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भारत निवडणूक आयोगाने निवडणूक खर्च निरीक्षक म्हणून उमेश कुमार (IRS)-(C&CE) यांची नियुक्ती केली आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सिद्धार्थ भंडारे यांनी दिली.
उमेश कुमार यांनी बुधवार, दिनांक 23 ऑक्टोबर 2024 रोजी मतदारसंघातील निवडणूक कार्यालयास भेट दिली. निवडणूक निर्णय अधिकारी सिद्धार्थ भंडारे यांच्या उपस्थितीत प्रत्येक विभागाची तपशीलवार माहिती घेऊन निवडणूक कामकाजाच्या कार्यपद्धतीबाबत मार्गदर्शक सूचना दिल्या. मतदारांच्या तक्रारींसाठी cVIGIL ॲपचा वापर करून तक्रारी नोंदवण्याचे आवाहनही करण्यात आले.
या प्रसंगी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सुनंदा भोसले, निवडणूक नायब तहसीलदार चित्रा ननावरे, निवडणूक खर्च समन्वय अधिकारी कमलकिशोर राठी, सहाय्यक खर्च निरीक्षक विनोद शिंदे आणि मधुकांत प्रसाद, आचार संहिता कक्ष समन्वयक अधिकारी धनश्री नलावडे, माध्यम कक्ष समन्वयक अधिकारी प्रज्ञाराणी भालेराव, मुख्य समन्वयक सुहास विसपुते व सहाय्यक संपर्क अधिकारी संदीप गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.
उमेश कुमार यांचा निवास पत्ता आणि संपर्क माहिती पुढीलप्रमाणे आहे:
निवास पत्ता: रूम नंबर A-105, ग्रीन बिल्डिंग, व्हीव्हींआयपी सर्किट हाऊस, क्वीन्स गार्डन, पुणे
ईमेल आयडी: expobs34pune@gmail.com
भेटण्याची वेळ: सकाळी 10:00 ते दुपारी 12:00
संपर्क अधिकारी:
सुहास विसपुते (संपर्क क्रमांक: 9011027187)
Post a Comment
0 Comments