कोंढवा :- हडपसर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार चेतन तुपे यांनी नुकतीच कौसरबाग सोसायटीतील मशिदीला भेट दिली. या भेटीत त्यांनी परिसरातील मुस्लिम बांधवांशी संवाद साधला. यावेळी अनेक ज्येष्ठ मंडळींसोबतच तरुणाईही मोठ्या संख्येने उपस्थित होती.
चर्चेदरम्यान तुपे यांनी तरुणांच्या सकारात्मक दृष्टिकोनाची प्रशंसा केली आणि त्यांची विविध विषयांवरील समज लक्षात घेतली. तुपे यांनी या तरुणांनी दाखवलेल्या विश्वासाबद्दल आभार मानले आणि त्यांचे नेतृत्व स्वीकारण्याची तयारी दाखवल्याबद्दल समाधान व्यक्त केले.
या भेटीत पुणे महानगर पालिकेच्या माजी नगरसेविका नंदाताई लोणकर, माजी नगरसेवक फारुख नाना इनामदार, गफूर भाई पठाण, हाजी फिरोज शेख, रईस भाई सुंडके, हसीना भाभी इनामदार, नारायण लोणकर, अल्ताफ भाई शेख आदी मान्यवरांसह परिसरातील मुस्लिम तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments