वडगावशेरीत काटे टक्कर लढतीची शक्यता ? दोघांचे भांडणात तिसऱ्याचा होणार लाभ, मतदार संघात तिसरा भिडू कोण?
पुणे (सोमनाथ साळुंके / मुज्जम्मील शेख) :-
आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत राज कीय नेत्यांचे लक्ष वेधून राहिलेल्या वडगावशेरी विधानसभा मतदारसंघात होणाऱ्या निवडणुकीत काटे टक्कर लढत होणार असली तरी पण तिसऱ्या उमेदवाराने देखील निवडणुकीच्या दृष्टीने पाऊल उचलल्याने या भागात दोघांचे भांडण व तिसऱ्याचा हे सध्या गणित दिसून येत असले तरी पण तिसरा भिडू कोण? याकडे राजकीय नेत्यासह मतदारांचे लक्ष वेधून घेतले आहे.
नव्या फैराचानेनुसार २००९ साली वडगाव शेरी हा मतदार संघ जाहीर झाल्यावर मतदार संघावर सर्वात प्रथम माजी आमदार बापूसाहेब पठारे यांच्या रूपाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकविण्यास यश मिळविले होते.त्यावेळेस पठारे यांनी देखील मतदारांचा विश्वास सार्थ ठरवत या भागातील असलेला पाणीप्रश्न सोडविण्यााठी प्राधान्य दिले असतानाच त्यांनी खराडी भागात पाय रोवून आयटी पार्क परिसरात उभारण्यास त्यांचा सिंहाचा वाटा असून आज अनेक कुटुंबातील महिला व तरुणांना नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्याने अनेकांच्या मनामध्ये त्यांच्या कामाच्या बाबतीत समाधान व्यक्त होत असतानाच आज ते पदावर नसताना देखीलकाही दिवसापूर्वीच त्यांनी भाजपला रामराम करून पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार)गटात घरवापासी केल्याने कार्यकर्त्यांसह मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे.पक्षाकडून ते प्रबळ दावेदार मानले जात आहे.
मतदार संघाचे दोन वेळचे एक वैशिष्ट आहे की,या भागातून एकदा उमेदवार निवडून गेल्यावर पुन्हा तो दुसऱ्यांदा निवडून येत नसल्याची खंत अनेकांच्या मनाला लागून राहिली आहे.कारण २०१४साली झालेल्या निवडणुकीत भाजपच्या रूपाने जगदिश मुळीक यांनी देखील केलेल्या विविध कामामुळे बापूसाहेब पठारे यांचा पराभव करून मतदार संघावर पक्षाचा झेंडा फडकविण्यास यश मिळविले होते.त्यांची राजकारणाची असलेली गनिमी काव्याची रणनिती व युवा कार्यकर्त्यांची असणारी फौज ही त्यांच्या विजयात यशाचा वाटा असल्याचे त्यावेळेस दिसून आले होते.मात्र २०१९ साली विद्यमान आमदार सुनील टिंगरे यांनी मुळीक यांना पराभवाची धूळ चारून या मतदार संघावर पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)गटाचा झेंडा फडक विण्यास यश मिळविले होते.
सध्या टिंगरे हे महायुतीत सहभागी असून हडपसर सह या मतदार संघावर अजित पवार गटाने दावा केल्याने त्यांची उमेदवारी जरी पक्की मानली जात असली तरी पण पाच वर्षात लोहगाव भागाचा पाणीप्रश्न,पावसाळ्यात रस्त्यावर पूरपरिस्थिती होऊन घरांनी शिरणाऱ्या पाण्यामुळे व काही प्रमाणात विकासकामांना बसलेल्या खीळ यामुळे मतदारांमध्ये नाराजीचे सूर मतदारांमध्ये असल्याचे दिसून येत असतानाच मतदार संघात सत्ताधारी पक्षाची युती असली तरी पण विरोधकांना शह देण्यासाठी मुळीक यांनी दंड थोपटून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी दर्शविली असून त्यांनी मतदारांच्या गाठीभेटी वर भर देऊन पुन्हा एकदा राजकारणाची गणिते जुळवून ते सक्रिय झाले आहेत.त्यामुळे त्यांनी निवडणुकीची गणिते देखील आखली असून टिंगरेंचा बालेकिल्ला असलेल्या धानोरी,टिंगरेनगर भागात मुळीक यांना मानणारा वर्ग असल्यामुळे त्यांची ही जमेची बाजू असून सत्ताधारी महायुतीत ज्या पक्षाची मतदार संघावर सत्ता आहे.त्यांनाच हा मतदार संघ सोडण्याचे पक्षश्रेष्ठीकडून एकमत झाले असले तरी पण लोकसभा निवडणुकीत उमेदवारीचे दावेदार असलेले मुळीक यांना पक्षाने उमेदवारी नाकारल्यामुळे कार्यकर्त्यात नाराजीचे सुर असतानाच पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीत हा मतदार संघ राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा पवार)गटाला जाणार असल्यामुळे जर भाजपने मुळीक यांना शक्यतो तिकीट नाकारल्यास मुळीकांनी तरी पण अपक्ष निवडणूक लढण्याचा चंगच बांधल्यामुळे व पक्षश्रेष्ठींना त्यांची नाराजी दूर करण्यास अपयश आले व ते निवडणुकीच्या रिंगणात उतरले तर मतदार संघात होणारी निवडणूक रंगतदार होऊन रोमहर्षक होणार असल्याची चर्चा सध्या मतदार संघात रंगली असतानाच होणारी लढत ही तिरंगी होऊन या निवडणुकीत दोघांचे भांडण व तिसऱ्या उमेदवाराचा लाभ होणार असल्याचे चित्र सध्याच्या राजकीय वातावरणातून दिसून येत आहे.तर अनिल (बॉबी)टिंगरे यांनी विद्यमान आमदारांना २०१२साली झालेल्या पालिका निवडणुकीत कात्रजचा घाट दाखवत पराभवाची धूळ चारल्यामुळे त्यांनी देखील विधानसभा निवडणुकीची तयारी दर्शवील्याने.मतदार संघात त्यांच्या रूपाने ठिणगी पडण्याची शक्यता व्यक्त होत असताना त्यांनी देखील काही कारणास्तव त्यांनी माघार घेतली असल्याचे जरी बोलले जात असले तरी पण त्यांच्या रूपाने धानोरी भागात अनिल(बॉबी)टिंगरे यांना मानणारा वर्ग असल्यामुळे मुळीक यांची ही जमेची बाजू असल्याचे बोलले जात असले तरी पण त्यांनी निवडणुकीची पुन्हा तयारी दर्शविली तर या ठिकाणी राजकारणाचे गणित वेगळेच दिसणार असून मतदार संघात इतर ही छोटे पक्ष निवडणुकीच्या रिंगणात उमेदवार उतरवणार असले तरी पण या मतदार संघात खऱ्या अर्थाने तिरंगी लढत होणार असल्याची चर्चा जरी रंगली असली तरी पण वडगावशेरीत उमेदवारीचा आता तिसरा भिडू कोण?याची उत्सुकता मतदारांची शिगेला पोहचून याचा सर्व तपास येणाऱ्या निवडणूक काळातच कळेल हे मात्र निश्चित मानले जात आहे.
Post a Comment
0 Comments