Type Here to Get Search Results !

Add 1 BY 4 1200 PX By 300 PX

हडपसर विधानसभेत चेतन तुपे पाटील यांचा जोश ; प्रशांत जगताप यांच्या विरोधात मैदानात चेतन तुपे पाटील यांची आघाडी...


हडपसर विधानसभेत चेतन तुपे पाटील यांचा जोश ; प्रशांत जगताप यांच्या विरोधात मैदानात चेतन तुपे पाटील यांची आघाडी...

पुणे कोंढवा (मुज्जम्मील शेख) :- हडपसर विधानसभेचे बिगूल वाजले असतानाच महायुतीचे उमेदवार चेतन तुपे पाटील ( MLA Chetan Tupe Patil Hadapsar ) आणि महाविकास आघाडीचे प्रशांत जगताप ( Prashant Jagtap ) यांच्या दरम्यान जोरदार सामना रंगण्याची चिन्हे दिसत आहेत. हडपसर मतदारसंघात चेतन तुपे यांचा कार्यकर्ता वर्ग अधिक सक्रिय असून, त्यांच्या भेटीगाठी आणि प्रचारातही जोश वाढला आहे.


हडपसर, सय्यद नगर, कोंढवा या भागात चेतन तुपे यांची मजबूत पकड आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या विकास कामांमुळे या भागातील नागरिक समाधानी आहेत. तसेच, त्यांच्या व त्यांचे जवळीक असलेले कोंढव्यात असलेले माजी नगरसेवक रईस सुंडके ( Raees Sundke), परवीन हाजी फिरोज शेख ( Parveen Haji Firoz ), गफूर पठाण ( Gafur Pathan ), हाजी फिरोज शेख ( Haji Firoz ), हसीना ईनामदार ( Hasina Inamdar ) यांच्या अटळ परिश्रमाने संपर्क मोहिमेतून सामान्य नागरिकांना तुपे पाटील सहज उपलब्ध होत असल्याने त्यांच्याबद्दल आदर वाढत आहे.

प्रशांत जगताप यांच्या बाजूला असलेल्या महाविकास आघाडीतल्या काही बंडखोरांमुळे त्यांना आव्हानांचा सामना करावा लागत आहे. काही कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे वातावरण असल्याने या निवडणुकीत तुपे यांना अतिरिक्त पाठिंबा मिळण्याची दाट शक्यता आहे. या परिस्थितीचा लाभ घेत तुपे यांनी आक्रमक प्रचारावर भर दिला असून, त्यांनी मतदारसंघात आपल्या लोकप्रियतेचे प्रमाण वाढवले आहे.

हडपसर मतदारसंघातील अनेक भागात चेतन तुपे यांचे समर्थन वाढत असून, त्यांच्या जोशपूर्ण प्रचारामुळे मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण तयार होत आहे. यामुळे हडपसर विधानसभा निवडणुकीत चेतन तुपे यांना विजयाच्या दिशेने महत्त्वाचा फायदा मिळू शकतो.

Post a Comment

0 Comments