Type Here to Get Search Results !

Add 1 BY 4 1200 PX By 300 PX

ईद-ए-मिलाद निमित्ताने सिरत कमिटीच्या मनमानी कारभारा विरोधात पुण्यातील शेकडो मंडळांनी पुकारला बंड, पोलिसांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात ?

सिरत कमिटी फक्त चॉंद आणि ईद-ए-मिलाद पुरतीच आहे का ? तरूणांनी कमिटीच्या कारभारावर उपस्थित केला प्रश्न चिन्ह ? 

पुणे :- पुणे शहरात दरवर्षी प्रमाणे यंदाही मो. पैगंबर साहेबांची जयंती १६ सप्टेंबर २०२४ रोजी होणार होती. परंतु १६ सप्टेंबर रोजी काही ठिकाणी गणेश विसर्जन मिरवणूक निघत असल्याने मुस्लिम समाजातील संस्था, संघटना, मुस्लिम समाजातील वरिष्ठांनी पोलिसांशी सल्लामसलत करून सदरील १६ सप्टेंबर रोजी निघणारी मिरवणुक २१ सप्टेंबर २०२४ शनिवारी रोजी काढणार असल्याचे जाहीर केले आहे. परंतु सिरत कमिटीने तरूण मंडळाना विश्वासात न घेता एक हाती निर्णय घेतल्याने तरूणांनी याचा निषेध व्यक्त केला आहे. काही दिवसांपूर्वी ईद-ए-मिलाद निमित्ताने पुणे शहर पोलीस सह आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी एका व्हिडिओ द्वारे सुचना जारी केली होती की,या वेळी ईद-ए- मिलाद च्या दिवशी डीजे ( DJ) ला पुणे पोलीस परवानगी दिली जाणार नाही? या व्हिडिओ नंतर तरूणांनी कमिटीच्या कारभारा विरूद्ध रोष व्यक्त केला. त्यानंतर पुणे लष्कर पोलिस ठाण्यात जाऊन परवानगी मागितली असताना लष्कर पोलिसांनी अर्ज न स्विकारता काही मंडळाच्या कार्यकर्त्यांना हाकलून लावले. अश्या पोलिसांच्या भुमिकेने तरूणांनी नाराजी व्यक्त केली आहे. आमच्या आनंदावर गदा आणण्याचा अधिकार कोणी दिला? सिरत कमिटीला सकाळी मिरवणूक काढायची असेल तर त्यांनी खुशाल सकाळी काढावी ? परंतु तरुणांची मुस्कटबाजी अजिबात करू नये ? आम्हाला पण कळत पैगंबर साहेबांची ही शिकवण नाही की, डीजे वाजवायची. परंतु आम्ही साउंड वर फक्त कवाली, नातच वाजवत आणार आहे? परंतु २०० पेक्षा जास्त मंडळ सहभागी होतात. यावर पोलिसांनी सिरत कमिटीची बाजू धरून आमच्याशी दुजाभाव करू नये ? पोलीस प्रशासनानी याची तात्काळ दखल घेण्याची मागणी मंडळांनी पोलिस आयुक्तांना केली आहे.

पुणे वरीष्ठ पोलीस प्रशासनाने पारंपरिक पद्धतीने मुस्लिम समाजाचा महत्त्वपूर्ण उत्सव साजरा करण्यात काही अडतळा आणू नये. आणि सर्व धर्मांना जशी उत्सव साजरी करण्या करता परवानगी मिळते तसेच मुस्लिम समाजातील मंडळांना पण परवानगी देण्यात यावी. अशी भूमिका मुस्लिम युवकांनी व्यक्त केला आहे.

मंडळातील युवकांवर आणि यांना मदत करणाऱ्यांवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न...
सूत्रांकडून अशी माहिती मिळाली आहे की, 258 मंडळाच्या अध्यक्ष व त्यांच्या कमिटीतील कार्यकर्त्यांवर बहिष्कार आणि खोटे गुन्हे दाखल करणार असल्याचे माहिती अधिकृत सूत्रांकडून मिळाली आहे. तसेच यांना मदत करत असलेल्या पत्रकार, वकील, पोलीस, सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय पक्षाचे कार्यकर्ते यांच्यावर दबाव निर्माण करत असल्याचे चित्र सध्या पुण्यात उद्भवले आहे.

Post a Comment

0 Comments