Type Here to Get Search Results !

Add

Add

ईद-ए-मिलादच्या मिटींगमध्ये पुणे पोलिसांची उर्मट भाषा ? सदरील मिटींग सण साजरी करण्यासाठी आयोजित केली आहे का शक्ती प्रदर्शनासाठी, स्वतःची अक्कल नाही वापरणार? पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांचे वक्तव्याने तरूणांनी केला निषेध व्यक्त. पहा व्हिडिओ.


ईद-ए-मिलादच्या मिटींग मध्ये पुणे पोलिसांची उर्मट भाषा? सदरील मिटींग सण साजरी करण्यासाठी आयोजित केली आहे का शक्ती प्रदर्शनासाठी, स्वतःची अक्कल नाही वापरणार? पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांचे वक्तव्याने तरूणांनी केला निषेध व्यक्त. पहा व्हिडिओ...

सिरत कमिटीने तरुणांना पोरकं केलं ? जानकारांनी व्यक्त केली नाराजगी. 

संविधानाधिक पध्दतीने सण साजरा करताना पोलिसांना परवानगी देणे बंधनकारकच ? 

मुस्लिम समाजाने जयंती १६ सप्टेंबर ऐवजी २१ सप्टेंबर करून चुक केली का ? मग पोलिस रात्री १० वाजताच कार्यक्रम का बंद पाडणार ? १२ पर्यंत परवानगी का नाही ? 

पुणे :- काल दि.१० सप्टेंबर २०२४ रोजी पोलिस प्रशासनाच्या वतीने कौन्सिल हॉलच्या मागे अल्पबचत भवनमध्ये "ईद-ए-मिलादची" मिटींग आयोजित करण्यात आली होती. सदरील मिटींगला तरूणांनी चांगला प्रतिसाद दिला. परंतु तो प्रतिसाद काहींना बघेनासा झाला. सदरील मिटींग मध्ये सह पोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा, पोलिस उपायुक्त स्मार्थना पाटील, एसबीचे पोलिस उपायुक्त, पोलिस निरीक्षक रूणाल मुल्ला, व  इतर  अधिकारी उपस्थित होते.

सदरील मिटींगच्या दरम्यान पोलिस उपायुक्त समर्थना पाटील ह्या तरुण वर्गाचा उत्साह पाहून म्हणाल्या की, आपण सर्वांच्या मागणी प्रमाणे आजची मिटींग आयोजित केलेली आहे. ऍक्च्युली सण साजरी करण्यासाठी आहे का शक्ती प्रदर्शनासाठी हा एक प्रश्न उपस्थित होत आहे. अश्या ज्या पद्धतीने जमा झालेत? गोळा झालेत याच्यावरून? गणेशोत्सव वाल्यांनी डीजे लावला तर आम्ही देखील लावणार? त्यांनी तसं केलं तर आम्ही तसं करणार, स्वतःची अक्कल नाही वापरणार? चांगलं काय आहे समाजासाठी? एकत्र कशासाठी याव लागतं तर समाजासाठी?तरुण मंडळ हे भारताचे भवितव्य घडविण्यासाठी आहे नाही का मात्र स्वतःवर गुन्हे दाखल करून घेण्यासाठी? तर नियम मोडल्यावर आम्ही गुन्हे दाखल करणार?  असे वक्तव्य केल्याने, सदरील मिटींगच्या ठिकाणी गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. परंतु पोलिसांनी डीजे ला नव्हे तर स्पीकर परवानगी देण्यात यावी असे तरूणांचे म्हणणे होते. त्या संदर्भात पोलिसांनी आपली बाजू मांडली व स्टेज सोडल्याने तरूणांनी नाराजगी व्यक्त केली आहे. पोलिस प्रशासनाने कोणत्याही एकाची बाजू उचलून धरू नये? संविधानिक पध्दतीने सण साजरा करण्याचा हक्क आपला सुध्दा संविधानाने दिला आहे. तसेच नियमानुसार औद्योगिक क्षेत्रात ७० ते ७५, व्यवसायिक क्षेत्र ६५ ते ५५, निवासी क्षेत्र ५५ ते ४५ , सायलेन्स झोन ५० ते ४० डेसिबल आवाजाची पातळी हवी? परंतु आज आपण पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात गेलो तर तेथील वाहनांचा आवाज, हॉर्नचा आवाज पाहिला तर १०० डेसिबलची मर्यादा ओलांडताना दिसून येते? तर सणासुदीच्या दिवशी किंवा वाढदिवसाच्या दिवशी वाजविले जाणारे फटाक्यांचा आवाज दिलेल्या नियमांपेक्षा जास्त आहे. मग पोलिस अशा आवाजात साउंडचा आवाज कसे मोजणार? पोलिसांनी सर्व जाती धर्माला नियम एक सारखेच ठेवावे? तर तसेच पोलिसांना सह.धर्मदाय कार्यालयाकडे किती जणांच्या नोंदणी आहेत. हे विचारण्याचा अधिकार नाही? असे अनेक मत जानकरांनी बोलताना व्यक्त केले आहे. तर पुन्हा एकदा मिटींग घेतली जाईल व त्यात स्पष्ट केले जाईल असे पोलिस प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments