पुणे - गेल्या २० वर्षांपासून अत्यंत दर्जेदार शिक्षण देणाऱ्या ऑर्किड्स स्कूलला काही समाजकंटकांकडून नाहक बदनाम करण्याचा प्रयत्न होत आहे. या प्रकारामुळे शाळेचे व्यवस्थापन तसेच पालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे, त्यामुळे आमचे आवाहन आहे की, ऑर्किड्स स्कूलची तात्काळ बदनामी थांबवावी, असे प्रतिपादन भवानी पेठेतील ऑर्किड्स स्कूलच्या सचिव शाहेदा खान तसेच मुख्याध्यापिका हिना शेख यांनी केले.
पत्रकार परिषदेत बोलताना शाहेदा खान यांनी सांगितले की, शाळा परिसरात राहणाऱ्या काही लोकांनी पत्रकार परिषद घेऊन शाळेसंदर्भात धांदात खोटे दावे केले. आमच्या शाळेची बंगले हे पूर्णपणे मजबूत असून, ती केवळ १० वर्षे जुनी आहे. सीओईपीच्या इंजीनिअर्सनी इमारतीबाबत अहवाल दिला आहे. त्यामध्ये शाळेची बंगले सर्व चांगले असल्याचे अहवाल दिले आहे. त्यामुळे शाळेची इमारत जीर्ण असल्याचा आरोप निखालस खोटा आहे. आमच्या शाळेची जागा एक बिल्डर आणि परिसरातील काही समाजकंटक नागरिकांना हडपायची असल्या कारणाने ते आमच्या शाळेवर खोटेनाटे आरोप करीत आहेत.
👇👇 पहा व्हिडीओ 👇👇
👆👆 पहा व्हिडीओ 👆👆शाहेदा खान यांनी सांगितले की, आमच्या शाळेत गरीब व सर्वसमान्य नागरिकांची मुले शिकत आहेत. दर्जेदार शिक्षणामुळे शाळेच्या कामकाजावर पालकदेखील खुश आहेत. या स्थितीत संस्थेची बदनामी करणे हे पूर्णपणे चुकीचे आहे. आमच्या शाळेची फी खूप जास्त असल्याचा आरोप होतो. तोही पूर्णपणे खोटा आहे. परिसरातील काही नालायक लोक आमच्या आमच्या संस्थेची बदनामी सोशल मीडियावर करीत आहेत. आम्ही त्यांच्याविरोधात मानहानीचा दावा दाखल केला आहे. आमची शाळा ही पूर्णपणे शासकीय मान्यता प्राप्त असून, सर्व नियमांचे आम्ही काटेकोरपणे पालन करीत असतो. खरेतर शाळेच्या परिसरात जी फ्लॅट आहेत, त्या फ्लॅटच्या मालकांना एका बिल्डरने हाताशी धरून शाळेची जागा हडपण्यासाठी बदनामीचा घाट घातला आहे. परंतु आम्हीही याविरोधात लढणार. काहीही झाले तर विद्यार्थी व पालकांसाठी आम्ही लढत राहण्याचा निर्धार केला असल्याचे शाहेदा खान यांनी या वेळी सांगितले.
Post a Comment
0 Comments