Type Here to Get Search Results !

पुणे मनपा मंडई विभागात घोटाळा ? आरोग्य निरीक्षक सुहास पांढरे यांनी दिल्या पत्रकारांना धमक्या, अधिकाऱ्यांची गैरवर्तणूक...


पुणे मनपा मंडई विभागात घोटाळा ? आरोग्य निरीक्षक सुहास पांढरे यांनी दिल्या पत्रकारांना धमक्या, अधिकाऱ्यांची गैरवर्तणूक...

पुणे : पुणे मनपाच्या मंडई विभागात एक गंभीर आरोप समोर आला आहे. प्रभारी मंडई अधिकारी असलेले आरोग्य निरीक्षक सुहास पांढरे यांच्यावर पत्रकारांना धमकावणे, माहिती अधिकार अर्जास उत्तर न देणे आणि पदाचा गैरवापर करण्याचे आरोप होत आहेत.

पांढरे यांना या पदावर नियुक्त करण्यामागे काही राजकीय आणि आर्थिक साठेबाजी असल्याचा संशय व्यक्त होत आहे. त्यांच्यावर घनकचरा विभागात असताना फक्त आर्थिक फायदा होणाऱ्या कामांवर लक्ष केंद्रित केल्याचा आरोप आहे.


काय आहे प्रकरण ?

पत्रकारांना धमक्या : एका दैनिक वृत्तपत्राच्या पत्रकाराने पांढरे यांना माहिती अधिकार अर्ज केला होता. मात्र, दोन महिने उलटूनही त्याला उत्तर मिळाले नाही. पत्रकारांनी संपर्क साधला असता, पांढरे यांनी त्यांना उडवाउडवीचे उत्तर दिले आणि "कुठला पत्रकार आहे बघतोस तुला" असेही म्हटले.


पदाचा गैरवापर : पांढरे हे आरोग्य निरीक्षक असूनही त्यांना मुख्य मंडई अधिकारी या पदावर नियुक्त करण्यात आले आहे. याबाबत सर्व आरोग्य निरीक्षकांमध्ये नाराजगी आहे.


आर्थिक साठेबाजीचा संशय : पांढरे यांचे तत्कालीन उपायुक्त यांच्याशी आर्थिक हितसंबंध असल्याचा आरोप आहे. त्यामुळेच त्यांना हे पद मिळाले असावे, असा संशय व्यक्त होत आहे.


अनेक संघटना करणार आंदोलन : या प्रकरणी दलित पँथर ऑफ इंडियाचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष इलियास शेख हे आणि हिंदी मराठी पत्रकार संघाने आयुक्तांकडे तक्रार दाखल करण्याची तयारी केली आहे.


सुहास पांढरे कोण ?

पांढरे हे आरोग्य निरीक्षक असून घनकचरा विभागात कार्यरत आहेत. त्यांनी कधीही प्रत्यक्ष क्षेत्रीय कार्यावर काम केलेले नाही. त्यांच्यावर फक्त आर्थिक फायदा होणाऱ्या कामांवर लक्ष केंद्रित केल्याचा आरोप आहे. त्यांचे तत्कालीन उपायुक्त यांच्याशी आर्थिक हितसंबंध असल्याचा आरोप आहे. 


पुढे काय ?

दलित पॅंथर ऑफ इंडिया आणि हिंदी मराठी पत्रकार संघ या प्रकरणी आयुक्तांकडे तक्रार दाखल करणार आहेत. आयुक्तांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.


पत्रकारांना अरेरावीची भाषा केल्यावर काळा फासणार - इलियास शेख महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष दलित पॅंथर ऑफ इंडिया...

या प्रकरणी इलियास शेख यांनी सांगितले की, सदर बाब ही अत्यंत निंदनीय आहे. असे होणे म्हणजे भारताच्या लोकशाहीचा गळा दाबणे इथपर्यंत ही बाब पोहोचली आहे. अश्या मुजोर अधिकार्‍यांना आम्ही काळा फासल्याशिवाय शांत राहणार नाही. अशा अधिकाऱ्यांना आम्ही पॅंथर स्टाईल मध्ये आंदोलन करू आणि यांना यांची जागा दाखवून देऊ, असे इलियास शेख यांनी सांगितले आहे.

या प्रकरणामुळे पुणे मनपाची प्रतिमा धक्का बसू शकते. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे.


लवकरच यांचे टाइम्स ऑफ महाराष्ट्र आणखीन काही महत्त्वाची बाब आणणार समोर...


क्रमश:

भाग १

Post a Comment

0 Comments