खडक वाहतुक शाखेचा मोठा प्रश्न ? अधिकाऱ्यांचा शाखा बंद करण्याचा विचार ? नागरिकांमध्ये असंतोष...
पुणे :- पुणे शहरातील खडक भागात वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी वाहतुक शाखेची अत्यंत गरज असताना, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ही वाहतुक शाखा बंद करण्याचा विचार करून, नागरिकांमध्ये याबाबत असंतोष निर्माण झाला आहे.
या निर्णयामुळे खडक भागात गोटीराम भैय्या चौक, राष्ट्रभूषण चौक, टिळक रोड, सिलाई चौक, मामलेदार कचेरी व इतर येथे वाढणारी वाहतूक कोंडी आणखीनच गंभीर होण्याची शक्यता आहे. याबाबत नागरिकांनी प्रशासनाकडे या निर्णयाचे पुनर्विचार करण्याची मागणी करणार आहे.
नागरिकांचे म्हणणे काय ?
खडक भागात राहणाऱ्या नागरिकांनी या निर्णयाला तीव्र विरोध दर्शवला आहे. त्यांच्या मते, वाहतूक शाखा बंद केल्याने दैनंदिन जीवनावर परिणाम होईल. वाहतूक कोंडीमुळे रुग्णालय, शाळा आणि कार्यालयांना वेळेवर पोहोचणे कठीण होईल.
ही ट्राफिक शाखा सुरू असणे गरजेचे आहे. असे नागरिकांचे म्हणणे आहे.
Post a Comment
0 Comments