पुणे :- पुणे मनपा मध्ये कुठल्या ही शासकीय पदावर सेवा होण्यासाठी प्रत्येक उमेदवाराची एक किमान पात्रतेची गरज असते. ती पात्रता असल्यास त्या उमदेवाराची निवड निश्चित होते. मात्र, पुणे महानगरपालिकेचा क्रीडा विभाग या प्रक्रियेला अपवाद आहे की काय, अशी स्थिती सध्या दिसून येत आहे. त्याला कारणही तसेच आहे. पुणे महानगरपालिकेच्या क्रीडा विभागाने काही दिवसांपूर्वी सहायक क्रीडा अधिकारी वर्ग क्रमांक तीन पदासाठी कार्यालयीन परिपत्रक मनपा सेवकांमधून या पदाकरता पात्रसेवकांमधून अर्ज मागवले परंतु या पदासाठी असलेली किमान पात्रतेसोबतच स्पोर्ट्स ऑथोरिटी ऑफ इंडिया (साई) यांच्या एका सहा आठवड्याच्या सर्टिफिकेट कोर्सची पात्रता ठेवल्याने मोठे आश्चर्य व्यक्त होत आहे. या माध्यमातून मनपाचे काही वरिष्ठ अधिकारी हे गैरव्यवहाराचा खेळ तर करीत नाहीत ना, अशी शंका उपस्थित होत आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून पुणे मनपाचे क्रीडा अधिकारी व सहायक क्रीडा अधिकारी पदे रिक्त आहेत. खरेतर ही रिक्त पदे लवकरात लवकर भरून पुण्यातील क्रीडाविश्वात नवनवीन उपक्रम राबवणे गरजेचे होते. गेल्या अनेक वर्षांपासून याबाबतची मागणीदेखील होत होती. अखेर क्रीडा विभागाने सामान्य प्रशासनामार्फत कार्यालयीन परिपत्रक काढले यामध्ये दोन सहायक क्रीडा अधिकारी वर्ग 3 ही पदे भरण्यासाठी किमान पात्रता ही ग्रॅज्युएट बीपीएड अशी आहे. याच्या जोडीला खेळाडू , शासकीय कामांमध्ये तीन वर्षाचा अनुभव संबंधित उमेदवार हा या पदासाठी पात्र दावेदार ठरू शकतो. परंतु परिपत्रका मध्ये एक मोठी गोम आहे.
स्पोर्ट्स ऑथोरिटी ऑफ इंडियाच्या वतीने एक सहा आठवड्यांचे प्रमाणपत्र प्रशिक्षण घेतल्या जाते. तेही ऑनलाईन असते व 15 दिवस ऑफलाईन भारतामध्ये कोठेही याच्याबाबत एक खेळाचा कोचिंग कोर्स म्हणून खेळाडू याची निवड करतात एखाद्या खेळाडूला संबंधित खेळात पुढे जाऊन कोचिंग करायचे असल्यास त्याला हे प्रशिक्षण महत्वाचे ठरते. खरेतर स्पोर्ट्स ऑथोरिटी ऑफ इंडियाच्याच म्हणण्यानुसार हे एक बेसिक क्रीडा प्रशिक्षण आहे. त्यामुळे या प्रशिक्षणाला फार काही महत्व देण्याची गरज नाही. मात्र, मनपाच्या प्रकाशित झालेल्या कार्यालयीन परिपत्रकात तिसऱ्या क्रमांकावर या सहा आठवड्यांच्या कोर्सची मागणी करण्यात आली आहे.
विशेष बाब म्हणजे काही वर्षांपूर्वी ज्या काही क्रीडा विभागाकडून प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातींमध्ये किंवा क्रीडा अधिकारी व सहायक क्रीडा अधिकाऱ्यांच्या नियुक्तीत हे सहा आठवड्यांचे प्रशिक्षण कधीही अनिवार्य करण्यात आले नव्हते. परंतु या वेळी ते अनिवार्य करण्यात आल्याचे दिसून येत आहे. नेमकी याच ठिकाणी शंकेची पाल चुकचुकली आहे. कारण स्वतः स्पोर्ट्स ऑथोरिटी ऑफ इंडियाच्या म्हणण्यानुसार जर हा एक बेसिक कोर्स आहे व यामध्ये उमेदवाराला त्याच्या आवडीच्या खेळाविषयी प्राथमिक माहिती दिली जाते, तर मग मनपामध्ये सहायक किंवा क्रीडा अधिकारी पदाच्या भर्तीसाठी या कोर्सला महत्व मनपाचे अधिकारी का देत आहेत? यातून मनपाच्या अधिकाऱ्यांचा काहीतरी वेगळा हेतू स्पष्टपणे दिसून येत आहे.
मनपामध्ये कोणीतरी असा सेवक आहे ज्याला आपल्या मर्जीतील कोण्यातरी सेवकाची या पदांवर भर्ती करायची आहे. तसेच त्याच्या मर्जीतील संबंधित सेवकाने हा सहा आठवड्यांचा कोर्स पूर्ण केलेला असण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळेच ही अट टाकून इतर पात्र उमेदवारांना बाजूला सारण्याचा संबंधित मनपा अधिकाऱ्याचा हेतू स्पष्ट होतो.
या प्रकारामागे कुठेतरी गैरप्रकार किंवा भ्रष्टाचार झालेला असण्याची दाट शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मनपाच्या काही सेवक आपल्या मर्जीतील तृतीय श्रेणीच्या कर्मचाऱ्याला बढती देऊन त्याला सहायक किंवा क्रीडा अधिकारी बनवायचे आहे. त्यासाठीच हा सहा आठवड्यांचा कोर्स अनिवार्य करण्याचा घाट घालण्यात आला आहे.
विशेष म्हणजे सहा आठवड्यांचा हा कोर्स अनिवार्य करण्यासंदर्भातील तरतुदीला शासनाकडून मंजुरी मिळवण्यासाठी मनपाच्या काही अधिकाऱ्यांनी तत्कालीन मनपा आयुक्त रुबल अग्रवाल, रवींद्र बिनवडे, आयुक्त विक्रम कुमार यांना चुकीची माहिती देऊन त्यांची दिशाभूल केली. तसेच त्यानंतर मनपाकडून जो प्रस्ताव राज्याच्या नगरविकास विभागाला गेला, त्या ठिकाणीदेखील अधिकाऱ्यांची दिशाभूल करण्यात आली आहे. यासंदर्भातील सर्व सबळ पुरावे हे दैनिकटाईम्स ऑफ महाराष्ट्रकडे उपलब्ध आहेत. यामध्ये अधिकाऱ्यांचा हेतू स्पष्ट होतो.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एका कनिष्ठ लिपिक - टंकलेखक कर्मचाऱ्यास क्रीडा अधिकारी पदावर बसवण्याचा आटापीटा मनपाचे काही अधिकारी करीत आहेत. त्यासाठीच ही सर्व उठाठेव मनपाचे अधिकारी करीत आहेत.
काही पात्र आणि अनुभवी अधिकाऱ्यांना पदोन्नतीत डावलून कमी सेवाकाल झालेल्या अधिकाऱ्याची नियुक्ती पदोन्नतीच्या माध्यमातून देण्याचा यामध्ये मनपा अधिकाऱ्यांचा डाव असल्याचे स्पष्ट झाले आहे. एक जागरुक व्हिसल ब्लोअरमधून टाईम्स ऑफ महाराष्ट्र मनपाच्या अधिकाऱ्यांचा हा गैरव्यवहार हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही.
Post a Comment
0 Comments