पुणे :- इंफिनिक्सने नोट ४०एक्स फाईव्ह जी हा नवीनतम स्मार्टफोन सादर केला. हा स्मार्टफोन एक मध्यम-श्रेणीतील स्मार्टफोन आहे. हा स्मार्टफोन दोन व्हेरियंट्समध्ये उपलब्ध असेल. यातील १२जीबी प्लस २५६ जीबी व्हेरियंट्सची किंमत ही रुपये १४,९९९/- आहे. तर ८जीबी प्लस २५६ जीबी व्हेरियंट्सची किंमत ही १३,४९९/- आहे. जोडीला या स्मार्टफोनमध्ये उत्तम परफॉर्मन्ससाठी पॉवरफुल मीडियाटेक डायमेंसिटी ६३०० प्रोसेसर आहे. तर क्वाड-एलईडी फ्लॅश आणि १५ प्लस मोडसह ऍडव्हांस्ड १०८ एमपी ट्रिपल एआय कॅमेरा, उच्च-गुणवत्तेच्या सेल्फींसाठी एलईडी फ्लॅशयुक्त ८ एमपी फ्रंट कॅमेरा अश्या सुविधा आहेत.
तसेच या स्मार्टफोनमध्ये प्रीमियम ऑडिओ अनुभवासाठी डीटीएस साउंडयुक्त ड्युअल स्पीकर, साइड-माउंट फिंगरप्रिंट सेन्सर, फेस अनलॉक या सुविधा सुद्धा आहेत. जोडीला ऍडव्हांस्ड कनेक्टिव्हिटी ऑप्शन्ससाठी मल्टी-फंक्शनल एनएफसी सुविधा पण या स्मार्टफोनमध्ये आहे. इंफिनिक्सने नोट ४०एक्स फाईव्ह जी हा स्मार्टफोन पाम ब्लू, स्टारलिट ब्लॅक आणि लाइम ग्रीन अशा तीन आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध आहे. तरी हा स्मार्टफोन ९ ऑगस्टपासून विक्रीसाठी उपलब्ध होईल
Post a Comment
0 Comments