Type Here to Get Search Results !

Add 1 BY 4 1200 PX By 300 PX

पुणे ग्रामीण पोलीस शिपाई चालक भरतीची आज पुण्यात लेखी परीक्षा...


पुणे ग्रामीण पोलीस शिपाई चालक भरतीची आज पुण्यात लेखी परीक्षा...

पुणे :- पुणे ग्रामीण पोलीस घटकाची पोलीस शिपाई चालक भरती २०२२-२३ च्या मैदानी व कौशल्य चाचणी उत्तीर्ण होवून लेखी परिक्षेस पात्र झालेल्या उमेदवारांचा निकाल दिनांक २७/०७/२०२४ रोजी घोषित करण्यात आला आहे. लेखी परिक्षेस पात्र असलेल्या एकूण ५६७ उमेदवारांची दिनांक ०९/०८/२०२४ रोजी लेखी परिक्षा घेण्याचे नियोजित करण्यात आले आहे.

पोलीस शिपाई चालक पदाच्या लेखी परिक्षेस पात्र उमेदवारांची परिक्षा "सिंहगड टेक्नीकल एज्युकेशन सोसायटी स.नं.४४/९, सिंहगड रोड समोर, बडगाव बु. पुणे-४११०४१ या ठिकाणी दिनांक ०९/०८/२०२४ रोजी सकाळी १०.०० वा. घेण्यात येणार आहे. तरी उमेदवारांनी लेखी परिक्षेच्या ठिकाणी दिनांक ०९/०८/२०२४ रोजी सकाळी ०८:०० वा. उपस्थित रहावे.

अशी माहिती पंकज देशमुख यांनी दिलेली आहे.

Post a Comment

0 Comments