पुणे शिक्षण विभाग तक्रार आल्यावर तडजोड करण्यात मग्न ? महिला शिक्षिका, शिक्षक यांनी अनेक तक्रारी करून ही शिक्षण विभागाचे दुर्लक्ष ; मुनोत प्राथमिक विद्यालय संस्थापक अशोक मुनोत व सचिव निखिल मुनोत व ३ इतरांवर भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल...
ॲट्रॉसिटी, विनयभंग, खंडणी अशा गंभीर अनेक स्वरूपाचे मुनोत पिता पुत्रांवर गुन्हे दाखल...
पुणे :- पुणे शहराला विद्येचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. आणि याच कात्रज पुणे शहरात स्व. अंबरचंदजी मुनोत शिक्षण संस्था संचलित, मुनोत प्राथमिक विद्यालय व स्व.सौ.झुंबरबाई मुनोत माध्यमिक विद्यालय कात्रज, पुणे या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अशोक मुनोत, सचिव निखिल मुनोत, संस्थेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी हर्षदा मुनोत ऊर्फ गुगळे, माध्यमिक मुख्याध्यापिका सुरेखा सुतार व प्राथमिक मुख्याध्यापिका उल्का नवगिरे हे गेल्या १० ते १२ वर्षांपासून येथील कर्मचारी व शिक्षकांची शारीरिक, मानसिक, आर्थिक व पिळवणूक करत आहेत. या अन्यायाविरोधात शिक्षण आयुक्तालय, शिक्षण उप संचालक व पुणे जिल्हा परिषद शिक्षण विभागाला सर्व शिक्षक यांनी दि.१७/०५/२०२३ रोजी तक्रार अर्ज, विनंती अर्ज व वारंवार अनेक स्मरणपत्रे देऊनही शिक्षण विभागाने आज पर्यंत त्यांची कुठलीही दखल घेतली नाही. याच्या मागे नेमकं काय कारण असेल ह्याचा शोध लावला असता.
शिक्षण विभाग हे तक्रार आल्यावर तडजोड करत असल्याचे निदर्शनास आले आहे. शेवटी हे सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांनी या होणाऱ्या अन्यायाविरोधात मिळणाऱ्या वागणुकीबाबत तसेच सहशिक्षक मल्लिकार्जुन वाडेकर यांच्यावर होणाऱ्या जातीवाचक शिवीगाळ, वेठबिगारी, शिवीगाळ, मारहाण, तसेच ईतर घाणेरडी कामे लावणे, शिक्षकांचे बेकायदेशररित्या मनमानी पद्धतीने निलंबन करुन बडतर्फ करणे, जातीवरून हिणवणे , वारंवार पैश्याची मागणी करणे, कर्मचाऱ्यांना हिनदर्जाची वागणूक देणे, शासकिय सुट्टीच्या दिवशीही शिक्षक, महिला यांना शाळेत बोलावणे, जादा वेळ थांबवणे, नोकरीवरून काढून टाकण्याची धमकी देणे अशा प्रकारचा अन्याय अशोक मुनोत. निखिल मुनोत व ईतर ही गेल्या अकरा बारा वर्षापासुन सातत्याने करत आहे. या होणाऱ्या अन्यायाविरोधात अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम 1989 नुसार ऍट्रॉसिटीचा गुन्हा भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन या ठिकाणी दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी संस्थापक अध्यक्ष अशोक मूनोत, सचिव निखिल मूनोत व मुख्याध्यापिका सुरेखा सुतार या तिघांवर ऍट्रॉसिटी गुन्हा दाखल करण्यात आला होता. यामध्ये निखिल मूनोत यांना पोलिसांनी दि.१३/०४/२०२४ रोजी अटक केल्यानंतर न्यायालयाने योग्य त्या अटी शर्तीवर त्यांना तात्पुरता जामीन मंजूर केला होता. परंतु जामीनावर बाहेर
पडल्यापासून निखिल मुनोत व ईतर शिक्षक व कर्मचाऱ्यांना धमक्या देत आहेत. निखिल मुनोत, अशोक मुनोत हे सर्व जाणीवपूर्वक शिक्षक व कर्मचाऱ्यांना धमकी देणे, प्रति महिना पगाराच्या १०% रकमेची मागणी सर्रासपणे करत आहेत, दर महिन्याला पैसै दिले नाही तर बडतर्फ करणार अशा धमक्या दिवसाढवळ्या दिल्या जातात. वारंवार होणाऱ्या अत्याचाराला कंटाळून शिक्षकांनी संस्थापक अशोक मुनोत , सचिव निखिल मुनोत , संस्थापक यांची कन्या हर्षदा मुनोत (गुगळे), प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका उल्का नवगिरे, माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सुरेखा सुतार यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे.
काय म्हणाले शिक्षक व शिक्षिका ?
काही दिवसांपूर्वी माध्यमिक शिक्षक वाडेकर मल्लिकार्जून, प्राथमिक शिक्षिका मुप्पिडवार सुप्रिया व अन्य कर्मचाऱ्यांचे बेकायदेशीरपणे या शिक्षकांना बडतर्फ करण्यात आले आहे. सदर विद्यालयातील कर्मचारी गेल्या वर्षभरापासून शिक्षण विभागाकडे न्याय मागत आहेत तरीही शिक्षण विभाग जाणीवपूर्वक याकडे दुर्लक्ष करत आहे. संस्थापक अशोक मुनोत , सचिव निखिल मुनोत, संस्थापक यांची कन्या हर्षदा मुनोत (गुगळे ), प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका उल्का नवगिरे, माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सुरेखा सुतार, संस्था पदाधिकारी यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई होत नसल्याची भावना सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांची आहे.
आता तरी शिक्षण विभाग, शिक्षणाधिकारी साहेब, संचालक साहेब, उपसंचालक साहेब यांनी संस्था व शाळेवर प्रशासक नेमून कर्मचाऱ्यांवर होणारा अन्याय व शाळेत चालणारी बेकायदेशीर कामे , बेकायदेशररित्या वसुल करण्यात येणारी मनमानी फि, त्यामुळे पालक, विद्यार्थी व कर्मचाऱ्यांची होणारी आर्थिक पिळवणूक याबाबत शिक्षण विभाग दखल घेईल काय ? असे पीडित शिक्षकांनी सांगितले आहे.
सदर कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाबाबत पोलीस प्रशासन दखल घेत असून, अद्याप पर्यंत शिक्षण विभागामार्फत आजही दखल का घेतली जात नाही? याबाबत मात्र प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कारण दीड वर्ष होऊनही शिक्षण विभागामार्फत संस्था व शाळेविषयी चौकशी होऊनही शिक्षण विभाग दखल का घेत नाही ? संस्थाचालक व संस्था पदाधिकारी तसेच मुख्याध्यापक यांना शिक्षण विभाग पाठीशी का घालत आहे ? शिक्षण विभाग कोणत्याही प्रकारची दखल घेत नसल्याने कर्मचाऱ्यांना नाहक निलंबन तसेच बडतर्फ या कारवायांना सामोरे जावे लागत आहे. शिक्षकांनी केलेल्या कारवाईमुळे संस्थापक अशोक मुनोत, निखिल मुनोत व इतर यांच्याकडून त्यांना रस्त्यात अडवून धमकी देणे, शिवीगाळ करणे व त्यांना अन्यायाविरुद्ध वाचा फोडण्यासाठी मदत करणाऱ्या स्वयंसेवी संस्था, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार यांना धमकवण्याचा, खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी देण्याचे असे प्रकार सुद्धा मुनोत परिवार करत असल्याची माहिती समोर येत आहे.
आता तरी शिक्षण विभाग व प्रशासन संस्थापकावर कारवाई करणार का ? की बघ्याची भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Post a Comment
0 Comments