Type Here to Get Search Results !

Add

Add

आता पुणेकर महिला, तरुणींना नखांचे सौंदर्यही फुलवीता येणार ; पुण्यात फॅशनटीव्हीच्या पहिल्या प्रीमियम नेलस्टुडिओ’चे उद्घाटन...

आता पुणेकर महिला, तरुणींना नखांचे सौंदर्यही फुलवीता येणार
पुण्यात फॅशनटीव्हीच्या पहिल्या प्रीमियम नेलस्टुडिओ’चे उद्घाटन...

पुणे : आता पुण्यातील महिला आणि तरुणींना आपल्या नखांचे सौंदर्य अबाधित ठेवण्याची संधी मिळणार आहे.  फॅशनटीव्ही या जगातील सर्वात मोठ्या फॅशन आणि लाइफस्टाइल, मीडिया टेलिव्हिजन चॅनल ने पुण्यात प्रीमियम अशा 'एफ नेलस्टुडिओ' चे उद्घाटन केले. कोरेगाव पार्क येथे हा स्टुडिओ असून यावेळी पार पडलेल्या उद्घाटन प्रसंगी फॅशनटीव्हीचे व्यवस्थापकीय संचालक काशिफ खान, संचालिका सुश्री रुक्मणी सिंग हुड्डा, F नेलस्टुडिओच्या फ्रँचायझी मालक मीनल नीलेश कवूर आदी मान्यवर उपस्थित होते. आंतरराष्ट्रीय दर्जाची नेल केअर सेवांची विस्तृत श्रेणी ऑफर या ठिकाणी पुणेकर महिला, तरुणींना उपलब्ध झाली आहे.

याप्रसंगी बोलताना, फॅशनटीव्हीचे व्यवस्थापकीय संचालक काशिफ खान म्हणाले की, "आम्ही वेलनेसमधील एक नाविन्यपूर्ण नाव आहे. एलए एलिगन्सच्या सहकार्याने आम्ही आमचा पहिला एफ नेलस्टुडिओ लॉन्च केला आहे . याद्वारे पुण्यात आम्ही आंतरराष्ट्रीय दर्जाची सेवा उपलब्ध करून देत आहोत. या स्टुडिओच्या 
 फ्रँचायझी मालकी असलेल्या मीनल कवूर म्हणाल्या की, “ आम्ही नेल आर्ट आणि इतर नवकल्पनांसह उच्च-गुणवत्तेची नेल केअर सेवा शोधणाऱ्या लोकांसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सेवा ऑफर करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यापुढे म्हणाल्या की, “ उत्कृष्ट उत्पादनांचा वापर करून उच्च दर्जाच्या सेवा देण्यासाठी आमच्याकडे उच्च प्रशिक्षि एक टीम आहे. कलात्मक अभिव्यक्ती शोधणाऱ्यांसाठी, नखांचे सौंदर्य जपण्याची कला हे व्यक्तिमत्त्वात भर टाकते.    आमच्याकडे नेल आर्ट श्रेणीतील वधू आणि वधूंसाठी खास कला आणि डिझाइन्स आहेत" अशी माहिती कवूर यांनी दिली.

Post a Comment

0 Comments