पुणे खराडी - फ्लेवर्स स्ट्रीट सँडविचचे खराडी येथे त्यांच्या नवीन शाखेचे उद्घाटन झाले. पुण्यातील सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अथर्व सुदामे यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न झाले. फ्लेवर्स स्ट्रीट सँडविच हे एक लोकप्रिय सँडविच ब्रँड आहे. जे ताज्या, स्वादिष्ट आणि परवडणारी सँडविच बनवण्यासाठी ओळखले जाते. आणि खवय्यांना आवडणारा ब्रँड म्हणून ओळखले जाते.
नवीन शाखा हे गंगा कॉन्स्टेला रोड, ईऑन फ्री झोन, खराडी येथे आहे. ही शाखा 9 ते 11 वाजे पर्यंत खुले असेल.
या उद्घाटन दरम्यान उपस्थित असलेल्यांना मोफत सँडविच आणि पेय देण्यात आले.
सांस्कृतिक कार्यक्रम देखील सादर करण्यात आले.
नवीन शाखेचे उद्घाटन दरम्यान संचालिका अलमास कुची यांनी सांगितले की, "आम्हाला खराडी मध्ये फ्लेवर्स स्ट्रीट सँडविच आणण्याचा आनंद आहे. आम्हाला विश्वास आहे की आमच्या सँडविच आणि आमच्या उत्कृष्ट ग्राहकांच्या सेवेमुळे आम्ही स्थानिक समुदायात लवकरच लोकप्रिय होऊ. तसेच आम्ही आमचे ब्रँड संपूर्ण महाराष्ट्रात फ्रेंचायजी देणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले."
यावेळी अनेक मान्यवरांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली.
Post a Comment
0 Comments