पुणे (संपादक मुज्जम्मील शेख) : पुणे महानगरपालिकेमध्ये बोगस तक्रारी दाखल करून नागरिकांनी अधिकाऱ्यांना त्रास देण्याचे प्रकरण वाढत आहे. यामुळे खऱ्या गरजू नागरिकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष होत आहे आणि पालिकेच्या कामात अडथळा निर्माण होत आहे. तसेच पुणे महानगरपालिकेतले काही वरिष्ठ अधिकारी ह्या अर्जांना जाणून-बुजून खतपाणी घालत असल्याचे देखील निदर्शनास आले आहे. त्यामध्ये काही निनावी अर्ज आहेत. काही खोटे अर्ज आहेत. बऱ्याच अर्ज हे ईमेलद्वारे पाठवण्यात येत आहे मात्र पाठवणाऱ्याचे पत्ता, मोबाईल नंबर व ठोस माहिती व ओळख न देता हे अर्ज देत आहेत. या अर्जांचा जाणून-बुजून वरीष्ठ अधिकारी कनिष्ठ अधिकारी व कर्मचाऱ्यांना वेटीस धरण्याचा प्रकार करत आहेत. यामुळे कनिष्ठ अधिकारी व कर्मचारी यांच्या कामावर मोठा फटका बसत आहे. ज्यावेळी नागरिकांना अत्यावश्यक मदत हवी असते त्याच वेळेस ह्या कनिष्ठ अधिकाऱ्यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून त्रास देण्याचा प्रकार होत असतो. यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे आणि बोगस तक्रारदारांवर कारवाईची मागणी होत आहे.
अनेक प्रकारच्या बोगस तक्रारी :
अधिकाऱ्यांच्या नावाने खोटा अर्ज देणे.
अधिकाऱ्यांना मानसिक त्रास कसा निर्माण होईल या प्रकारे काम करणे.
यामध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे काही राजकीय पक्षाच्या पुढार्यांची देखील साथ घेऊन बोगस अर्ज केल्याचे निदर्शनास आले आहे.
आणि याच्या पेक्षाही मोठं म्हणजे काही राजकीय पक्षाचे माजी नगरसेवकांनी देखील कनिष्ठ अधिकाऱ्यांना कसा त्रास निर्माण होईल यासाठी काही माहिती अधिकार कार्यकर्ते व काही संघटनेतील पदाधिकारी यांच्या नावाने अर्ज केल्याचे देखील प्रकार पुणे महापालिकेत सुरू आहे.
पुणे महानगरपालिकेतल्या काही अधिकारी व कर्मचाऱ्यांची साथ घेऊन खोटा अर्ज देणे.
अधिकाऱ्यांचे वर्तणुकीबाबत तक्रार
इतर अनेक विषयांवर तक्रार केल्याचे प्रकार समोर आले आहे.
परिणाम :
अधिकाऱ्यांचा वेळ वाया जातोय.
खऱ्या गरजू नागरिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष होत आहे.
महापालिकेच्या कामात अडथळा निर्माण होतो.
नागरिकांमध्ये पालिकेबद्दल नकारात्मक भावना निर्माण होते.
कनिष्ठ अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये देखील नकारात्मक विचार सुरू झाले आहेत.
काही अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अक्षरशा काम सोडून दुसरीकडे कामाला लागल्याचे देखील प्रकार समोर आले आहे.
उपाययोजना :
बोगस तक्रारी ओळखण्यासाठी आणि त्यावर कारवाई करण्यासाठी प्रभावी यंत्रणा विकसित करणे.
नागरिकांना जागरूक करणे की बोगस तक्रार दाखल केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल.
गरजू नागरिकांना त्वरित मदत मिळेल याची खात्री करणे.
लवकर उपाययोजना गरजेची :
पुणे महानगरपालिकेने या समस्येवर त्वरित लक्ष देणे गरजेचे आहे आणि योग्य ती उपाययोजना करून महापालिकेतल्या कनिष्ठ अधिकारी व कर्मचारी यांना त्रासमुक्त सेवा पुरवणे आवश्यक आहे.
Post a Comment
0 Comments