Type Here to Get Search Results !

पुण्याचे वाट्टोळे भाजपच्या बिल्डरांनी ठेकेदारांनी केले - आदित्य ठाकरे

पुण्याचे वाट्टोळे भाजपच्या बिल्डरांनी ठेकेदारांनी केले - आदित्य ठाकरे...

पुणे : पुण्याचे वाट्टोळे भाजपच्या बिल्डरांनी,ठेकेदारांनी केले आदित्य ठाकरेपुणे सुंदर नैसर्गिकदृष्ट्या उत्कृष्ट असलेल्या पुण्याचे वाट्टोळे जर कोणी केले असेल तर ते भाजपच्या बिल्डर आणि ठेकेदारांनी केले.

गेली काही वर्षे पुणे पावसाने तुंबत आहे, वाहतुकीचा हि बट्ट्याबोळ झाला आहे यास हीच मंडळी कारणीभूत आहेत. पर्यावरणाचे संवर्धन न करता फक्त खिसे भरण्याचे उद्दिष्टय ठेऊन पुण्याचे वाट्टोळे केले गेले असा स्पष्ट आरोप शिवसेना नेते आदित्य उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

त्यांनी आज ट्विट करत म्हटले आहे कि ,आम्ही हे आधीच सांगत होतो की, घटनाबाह्य मुख्यमंत्री आणि भाजपाच्या बिल्डर-कॉंट्रॅक्टर मित्रांनी मुंबईप्रमाणेच पुण्यातील पायाभूत सुविधांचा बट्याबोळ केलेला आहे.

रिव्हर फ्रंट डिस्ट्रक्शन असो

वेताळ टेकडीची लावलेली वाट असो,

की नालेसफाईतला घोळ असो….

पहिल्या पावसातच जर पाणी तुंबायला लागलं असेल आणि जनजीवन विस्कळीत होत असेल तर ते पुण्यासाठी धोकादायक आहे.

चूकीच्या पद्धतीने चालू असलेली विकास कामं आणि बिल्डर मित्रांच्या भल्यासाठी सुरु असलेला पर्यावरणाचा ऱ्हास ह्यामुळे पहिल्या पावसानंतरच पुणेकरांचं जीवन त्रासदायक झालेलं आहे.

Post a Comment

0 Comments