पुण्यातील अनेक भागात ढगफुटीसदृष्य पाऊस...
पुणे : पुण्यात पहिल्याच पावसाने पुणेकरांची मोठी तारांबळ उडाली आहे. शहराच्या अनेक भागांत ढगफुटीसदृष्य पाऊस झाला आहे. त्यामुळे रस्त्यांना नद्याचं स्वरूप प्राप्त झालं आहे. रस्त्यांवरून गाड्या वाहून गेल्याच्या घटना समोर आल्या आहेत.
अनेक सखल भागांमध्ये पाणी साचल्याने नागरिकांना मोठी कसरत करावी लागत आहे. पुणेकरांची मोठी धांदल उडाल्याचं पाहायला मिळत आहे.
पुण्यातील अनेक भागांत रस्त्यावर पाणी साचलं आहे. त्यामुळे दुचाकी आणि चारचाकी वाहनांना मार्ग काढणं अवघड बनलं आहे. अनेक ठिकाणी पावसामध्ये अनेक दुचाकी अडकून पडल्याचं दिसत आहे. शहरात गटारी तुंबल्या आहेत, तर अनेक घरांमध्ये पाणी साचल्याचं दृश्य समोर आलेलं आहे. पाण्यात चालकासहित दुचाकी वाहून गेल्याची घटना समोर आली आहे.
पुणे शहरात काल झालेल्या पावसाने पुणेकरांचे मोठ्या प्रमाणावर हाल झाले आहेत. अनेक भागात अजूनही पाणी जमा आहे. पुण्यातील रेल्वे स्टेशन परिसरात असणाऱ्या सबवेमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी जमा झाल्याने प्रवाशांना या पाण्यातून जावं लागत आहे. तर अनेक दुकानदारांचंही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. रिक्षात पाणी आणि दुचाकी पाण्यात गेल्या आहेत. तर शहरात गटारी तुंबल्या आहेत.
पुण्यात अनेक भागात मुसळधार पाऊस सुरूच आहे. घोरपडी, कात्रज, लोहगाव सिंहगड रस्ता परिसरामध्ये जोरदार पाऊस सुरू आहे. अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली आहे.
Post a Comment
0 Comments