Type Here to Get Search Results !

स्वागताला झालेली गर्दी पाहून मुरलीअण्णांचे डोळे भरून आले...

स्वागताला झालेली गर्दी पाहून मुरलीअण्णांचे डोळे भरून आले...

पुणे : पक्षाने केलेली कदर सांगताना त्यांना गलबलून आले पुणे- गणपती मंडळाचा कार्यकर्ता होतो नगरसेवक होतो, येथेच नेत्यांच्या स्वागताला याच गर्दीत धक्केकेबुके खात यायचो महापौर झाल्यावर पुढे असायचो पण आज वेगळेच चित्र पक्षाने दाखवून दिले माझ्या प्रामाणिक कामाची दखल घेतली आणि इथवर आणून ठ्वले कि आज माझ्या स्वागतालाच येथे गर्दी झाली मुरलीधर मोहोळ म्हणाले आणि त्यांना पक्षाने केलेली कदर सांगताना त्यांना गलबलून आले.

केंद्रीय सहकार आणि नागरी हवाई उड्डाण मंत्रालयाचा पदभार स्वीकारल्यानंतर मुरलीधर मोहोळ आज सकाळी पुण्यात आले. यावेळी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांसह महायुतीच्या कार्यकर्त्यांनी देखील पुणे विमानतळावर मोहोळ यांचे जंगी स्वागत केले.ढोल, ताशा, हलगी आणि वारकऱ्यांच्या वेशातील मुलांनी मोहोळ यांचे स्वागत केले.प्रकाश जावडेकर, चंद्रकांत पाटील,अजितदादा गटाचे राष्ट्रवादी शहर अध्यक्ष दीपक मानकर भाजप शहर अध्यक्ष धीरज घाटे, शिंदे शिवसेनेचे नाना भानगिरेआणि अनेक नगरसेवक , माजी आमदार ,कार्यकर्ते मोहोळांच्या स्वागताला उपस्थित होते. यावेळी मोहोळ यांना कार्यकर्त्यांनी खांद्यावर उचलून घेत त्यांना पगडी परिधान केली. पुष्पहार घालून पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.यावेळी माध्यमांशी बोलताना मोहोळ म्हणाले, ' दुसऱ्यांच्या स्वागतासाठी पुणे विमानतळावर येणाऱ्या माझ्यासारख्या कार्यकर्त्यांच्या स्वागतासाठी आज इतकी गर्दी झाली, हे फक्त भारतीय जनता पार्टीतच होऊ शकते. मला आज खूप आनंद होत आहे. शहरातील आणि राज्यातील प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे केंद्रीय मंत्री मोहोळ यांनी सांगितले.

नागरी विमान वाहतूक आणि सहकार मंत्री म्हणून केंद्रात शपथबद्ध झालेले मुरलीधर मोहोळ आज दिल्ली वरून पुण्यात

आले आहेत. केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आज पहिल्यांदाच ते पुण्यात परतल्यानंतर त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले.

यावेळी अनेक भाजपा नेते देखील उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments