Type Here to Get Search Results !

Add

Add

आरक्षणाचा पेच अभियंता भरती प्रक्रिया ठप्प...

आरक्षणाचा पेच अभियंता भरती प्रक्रिया ठप्प...

पुणे : पुणे महापालिकेतील कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदाच्या ११३ जागांसाठी महापालिकेने जाहिरात काढली होती. या जागांसाठी २८ हजार ७०० अर्ज दाखल झाले आहेत. या उमेदवारांची लेखी परीक्षा घेतली जाणार होती.

पण राज्य सरकारने मराठा समाजासाठी १० टक्के आरक्षणाचा निर्णय लागू केला असून या आरक्षणाचा महापालिकेच्या भरतीच्या जाहिरातीमध्ये समावेश नाही.त्यामुळे 'एसईबीसी'चे आरक्षण ठेवायचे की नाही याबाबत मार्गदर्शन करावे अशी विनंती महापालिकेने राज्य सरकारकडे केली आहे. त्यास अद्याप उत्तर न आल्याने भरती प्रक्रिया ठप्प आहे.

महापालिकेने २०२२ आणि २०२३ मध्ये एकूण ७४८ जागांची भरती केली. त्यामध्ये कनिष्ठ अभियंता, लिपिक, अग्निशमन दलाचे जवान, आरोग्य विभागातील काही महत्त्वाच्या पदांचा समावेश होता. महापालिकेची हद्दवाढ झाल्याने कामाची व्याप्ती वाढलेली आहे.त्यामुळे कनिष्ठ अभियंत्यांची गरज आहे, अनेक जागा रिक्त असल्याने पहिल्या टप्प्यात महापालिकेने १३५ जागा भरल्या. त्यानंतर ११३ जागांची भरती प्रक्रिया सुरू केली. १६ मार्चपासून 'आयबीपीएस'च्या माध्यमातून अर्ज भरून घेण्यास सुरुवात केली. एकूण २८ हजार ७०० अर्ज दाखल झालेले आहेत.


Post a Comment

0 Comments