Type Here to Get Search Results !

पुण्यात पहिल्यांदाच सुपरपाथ हिप रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया ; ९५% रुग्णांच्या स्नायूंवर आघात न करता हिप प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी...


पुण्यात पहिल्यांदाच सुपरपाथ हिप रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया ; ९५% रुग्णांच्या स्नायूंवर आघात न करता हिप प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी...

पुणे : गुडघ्यांचा सांधा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करणाऱ्या रूग्णांची संख्या सध्या झपाट्याने वाढतेय. अशा स्थितीत आता पुण्यात पहिल्यांदा सुपरपाथ या नव्या तंत्रांद्वारे हिप रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात आल्या आहेत. पारंपारिक टोटल हिप रिप्लेसमेंटच्या तुलनेत आता सुपरपाथ हिप रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया रूग्णांसाठी अतिशय फायदेशीर ठरतेय. कुठल्याही प्रकारची चिरफाड न करता ही शस्त्रक्रिया केली जाते. याशिवाय स्नायू आणि ऊतींचे संरक्षण देखील केले जात आहे. परिणाम हिप प्रत्यारोपण शस्त्रक्रियेनंतर रूग्ण अवघ्या काही दिवसात बरा होऊन आपली दैनंदिन काम करू शकतो. 

 
बैठी जीवनशैली आणि वृद्धत्वामुळे खुब्यासंबंधीच हाडांच्या (हिप) समस्यांचे प्रमाण वाढत आहे. लठ्ठपणा, शारीरिक हालचालींचा अभाव आणि बसण्याची चुकीची पध्दत यासारख्या इतर कारणांमुळे खुब्यामध्ये वेदना जाणवते. एव्हॅस्कुलर नेक्रोसिस (एव्हीएन) आणि संधिवाताचा केवळ हाडांवरच परिणाम होत नाही तर आसपासच्या ऊती आणि स्नायूंवरही परिणाम होतो. हाडांमधील स्नायूंमुळे हिपची हालचाल करण्यात मदत करतात. ड्रायव्हिंग, बाइक चालविणे आणि व्यायाम यासारख्या क्रियांसाठी सर्जनचे मुख्य लक्ष्य हे मऊ ऊतींचे जतन करण्यावर असले पाहिजे. परिणामी, या व्यक्तींचे जीवनमान आणि गतिशीलता सुधारण्यासाठी हिप रिप्लेसमेंट शस्त्रक्रियांची वाढती गरज लक्षात घेणे गरजेचे आहे. सुपरपाथ तंत्र स्नायूंच्या ऊतींना नष्ट करणे टाळून टोटल हिप रिप्लेसमेंटसाठी एक उत्तम पर्याय ठरत आहे.

 
पुण्यातील जहांगीर, मणिपाल आणि ऑयस्टर अँड पर्ल (ओएनपी) रूग्णालयाचे ऑर्थोपेडिक आणि जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन डॉ. आशिष अरबट म्हणाले की, सुपरपाथ किंवा सुप्राकॅप्सुलर पर्क्यूटेनिअसली असिस्टेड टोटल हिप रिप्लेसमेंट म्हणून ओळखले जाणारे अत्याधुनिक तंत्र हे भारतात एक नाविन्यपूर्ण बदल घडवून आणण्यास फायदेशीर ठरत आहे. हे यूएसमध्ये विकसित केले गेले असून आता भारतात लोकप्रिय होत आहे. यामध्ये हिप जॉइंट बदलणे समाविष्ट आहे. सुपरपाथ हिप रिप्लेसमेंट शस्त्रक्रियेतून ९५% रुग्णांना स्नायूंवर आघात न करता लहान चीरा वापरून, स्नायूंना कमीत कमी नुकसान होते आणि अस्थिबंधन, विशेष उपकरणे आणि रोबोटिक्स वापरून अचूक फेमोरल रिप्लेसमेंट साध्य करता येते. जसे की सिरेमिक, धातूवर धातू आणि पॉलिथिलीनवर धातू आता या प्रगत प्रक्रियेचा भाग म्हणून पर्क्यूटेनस इम्प्लांट देखील केले जाऊ शकतात.


पुण्यात राहणारा सागर बैरागी हा पेशाने मॉडेल आणि आयटी प्रोफेशनल असून गेल्या २ वर्षांपासून दुहेरी एर्व्हस्कुलर नेक्रोसिस (एव्हीएन) या आजाराने पिडीत होता. त्याला सतत नितंबाच्या वेदना जाणवत होत्या. वेदना असहय होऊ लागल्याने त्याला दैनिक कार्यही करता येत नव्हते. शिवाय, नितंबाच्या दुखण्याने त्याच्या करिअरवरही परिणाम झाला होता. त्याने बंगळुरु येथील ४-५ तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेतला आणि यूएस स्थित डॉक्टरांशीही व्हिडिओच्या माध्यमातून सल्ला घेतला मात्र त्याच्या दुखण्यावर आवश्यक तेवढा आराम मिळू शकला नाही. रुग्णाला ५ फेब्रुवारी २०२४ रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि ६ फेब्रुवारी २०२४ रोजी सुपरपाथ तंत्राने दुहेरी-टोटल हिप रिप्लेसमेंट करण्यात आले. रुग्णाला ९ फेब्रुवारी २०२४ रोजी घरी सोडण्यात आले. रुग्णाने त्याची दैनंदिन दिनचर्या सहजतेने सुरू केली आणि कोणत्याही त्रासाशिवाय पूर्वीप्रमाणे मॉडेलिंग असाइनमेंट करु लागला.


बिहारमध्ये राहणारा २३ वर्षीय तनू मिश्रा या तरूणाला एका अपघातात हिपला गंभीर दुखापत झाली होती. अनेक डॉक्टरांकडून उपचार करून घेतले. परंतु, प्रकृतीत सुधारणा झाली नाही. दुखणं असहृय होऊ लागलं होतं. अशा स्थितीत माझ्या भावाला डॉ. आशिष अरबट यांच्याबद्दल कळले. भावाला मला तातडीने पुण्यातील डॉ. अरबट यांच्याकडे उपचारासाठी आणले. वैदयकीय चाचण्यांनंतर नितंबाला दुखापत असल्याचे लक्षात आले. अशा परिस्थितीत डॉक्टरांनी सुपरपाथ हिप रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया करण्यात आली. या शस्त्रक्रियेनंतर आता या तरूणाची आता वेदनेतून मुक्त झाला आहे.


स्वप्नील जाधव (३९) हे पुण्यातील मर्चंट नेव्ही ऑफिसरला मागील दोन वर्षांपासून नितंबात असहय वेदन जाणवत होत्या. वेदनेमुळे त्यांना चालताना, उभे रहायला आणि बसायला त्रास जाणवत होता. दैनंदिन काम करताना त्यांना कुटुंबातील अन्य सदस्यांवर अवलंबून रहावे लागत होते. वैद्यकीय तपासणीनंतर त्यांना एव्हॅस्कुलर नेक्रोसिस असल्याचे निदान झाले. रुग्णाची प्रकृती खालावल्याने त्याला नोकरी सोडावी लागली. तथापि, रुग्णाला ३१ मे २०२४ रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि १ जून २०२४ रोजी उजव्या नितंबासाठी सुपरपाथ तंत्राने संपूर्ण हिप रिप्लेसमेंट करण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर रूग्णाच्या प्रकृतीत सुधारणा पाहून ३ जून २०२४ रोजी घरी सोडण्यात आले आणि तो आता पूर्णपणे बरा झाला आहे. येत्या काही वर्षांत हिप रिप्लेसमेंट शस्त्रक्रियांची मागणी वाढण्याची अपेक्षा आहे.


नाविन्यपूर्ण अशा सुपरपाथ (Super PATH) तंत्रामध्ये लहानश्या छिद्रावाटे शस्त्रक्रिया, जलद पुनर्प्राप्ती, हॉस्पिटलमधील कालावधी कमी होणे, तसेच ऊतींचे नुकसान कमी करून वेदना कमी करणे समाविष्ट आहे. हा अनोखा दृष्टीकोन शस्त्रक्रियेनंतरच्या गुंतागुंत तसेच हिप डिस्लोकेशन्स आणि संसर्गाचा धोका कमी करतो. स्नायू आणि स्नायुबंध संरक्षित करून आणि अधिक नैसर्गिकरित्या सांध्यांची  हालचाल करण्यास अनुमती देऊन हे तंत्र जलद बरे होण्यास आणि दीर्घकालीन फायद्ये देणारे आहे. यामुळे शस्त्रक्रियेनंतरच्या जीवनाची गुणवत्ता वाढते. प्रक्रियेनंतर रुग्णांना कोणतेही निर्बंध येत नाहीत आणि ते कोणत्याही त्रासाशिवाय दैनंदिन क्रिया पूर्ववत सुरू करू शकतात. शस्त्रक्रियेनंतर ते स्वतंत्रपणे चालू शकतात आणि पाय दुमडून बसू शकतात. या तंत्राच्या यशामुळे आम्हाला अधिकाधिक रुग्णांवर खात्रीशीर परिणामांसह सर्वात सुरक्षित आणि अचूक मार्गांनी उपचार करणे शक्य झाले आहे, असेही डॉ अरबट यांनी म्हटले आहे.

Post a Comment

0 Comments