पुणे :- हज कमिटी ऑफ इंडिया निवड यादीमध्ये पुणे शहरातुन इसाक इस्माईल शेख यांची सौदी अरेबिया मक्का या ठिकाणी हाजी यांना समन्वय आणि मदत (खादीमूल हुज्जाज) करण्यासाठी केंद्र शासनामार्फत निवड करण्यात आली आहे. शेख यांची मक्का येथे 45 दिवसांसाठी 350 हाजी यांना समन्वय करण्यासाठी त्यांची निवड केंद्र शासनच्या वतीने देण्यात येणाऱ्या सर्व आदेशांचे सूचनांचे व सौदी सरकारचे आदेश सर्व काटेकोरपणे पालन करण्यासाठी त्यांना नेमून दिलेल्या साडे तीनशे हाजी लोकांकरीता मदत त्यामध्ये OPD दवाखाना, हॉस्पिटल सेवा बस सेवा, हाजी हरवल्यानंतर त्यांना आपल्या राहत्या ठिकाणी बिल्डिंगमध्ये पोहोचवण्याचे काम केले जात आहे त्यामध्ये भारतातील बरेचसे हाजी वयस्कर असल्यामुळे त्यांना व्हीलचेअर मिळून देणे. हाजी रस्ता भडकलेले असतात त्यांना आपल्या राहत्या ठिकाणी पोहोचवणे अचानकपणे झालेल्या आजारांसाठी त्वरित हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणे ही कामे केली जात आहेत.
शेख हे 26 मे रोजी मक्का येथे पोहोंचले आहेत. ते 26 मे ते 4 जुलै रोजी भारतात परतणार आहेत.
हज यात्रेसाठी भारतातून दीड लाख हज यात्री जाणार आहेत. हज कमिटी ऑफ इंडिया यांच्यामार्फत पुणे महानगरपालिकेत आरोग्य विभागात आरोग्य निरीक्षक म्हणून सेवेत असलेले इसाक इस्माईल शेख यांची (Khadimul Hujjaj) समन्वयक म्हणून निवड करण्यात आली आहे.
या हजयात्रे मार्फत इसाक शेख हे पुण्याचं आणि आपल्या भारताचं नाव लौकिक करत आहेत.
Post a Comment
0 Comments