Type Here to Get Search Results !

Add 1 BY 4 1200 PX By 300 PX

नारायण सेवा संस्थानतर्फे मोफत नारायण कृत्रिम अंग शिबीर 9 जूनला महाराष्ट्रात 21400 हून अधिक दिव्यांगांनी घेतला लाभ ; शिबीराकरिता मोफत प्रवेश...

नारायण सेवा संस्थानतर्फे मोफत नारायण कृत्रिम अंग शिबीर 9 जूनला महाराष्ट्रात 21400 हून अधिक दिव्यांगांनी घेतला लाभ ; शिबीराकरिता मोफत प्रवेश...

पुणे : नारायण सेवा संस्थानतर्फे पुण्यातील दिव्यांगांच्या कल्याणासाठी रविवार, दि. ९ जून रोजी क्वीन्स गार्डनअल्पबचत भवन येथे सकाळी ८ ते संध्याकाळी ६ यावेळेत मोफत नारायण कृत्रिम अंग शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. उदयपूर, राजस्थानच्या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या संस्थानतर्फे हे शिबीर घेण्यात येत असून ज्या व्यक्तींचे हात-पाय काही अपघात किंवा आजारामुळे निकामी होऊन अपंगत्व आले आहे, त्यांना अपंगत्वाच्या जीवनातून मुक्त करण्यासाठी संस्था प्रयत्नशील असल्याचे संस्थानचे विश्वस्त संचालक देवेंद्र चौबिसा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
 
पत्रकार परिषदेला संस्थानचे माध्यम व जनसंपर्क संचालक भगवान प्रसाद गौड़ यांसह इतरही मान्यवर उपस्थित होते.  यावेळी संस्थेचे विश्वस्त देवेंद्र चौबिसा, माध्यम व जनसंपर्क संचालक भगवान प्रसाद गौड़ आणि पुणे आश्रमाचे प्रभारी सुरेंद्र सिंह झाला, मुकेश सैन यांच्या हस्ते शिबिराच्या पोस्टरचे लोकार्पण करण्यात आले.

देवेंद्र चौबिसा म्हणाले, पद्मश्री विभूषित संस्थापक कैलास मानव आणि अध्यक्ष प्रशांत अग्रवाल यांच्या प्रेरणेतून संस्था गेली ३९ वर्षे मानवतेच्या क्षेत्रात सेवा करत आहे. कुआं प्यासे के पास या योजनेंतर्गत महाराष्ट्रातील दिव्यांगांना मदत करण्याचा संकल्प घेऊन हे शिबीर होत असून शिबिराचे उद्घाटन सकाळी ११ वाजता होणार आहे. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
 
शिबिरात दिव्यांग बांधवांना संस्थेच्या अनुभवी व तज्ज्ञ आॅर्थोटिस्ट व प्रोस्थेटिक डॉक्टरांच्या पथकाकडून तपासण्यात येणार असून, अवयवांचे मोजमाप पद्धतशीरपणे करून उच्चांकी कास्टिंग करण्यात येणार आहे. दर्जेदार आणि वजनाने हलके आणि टिकाऊ असे नारायण कृत्रिम हात, पाय आणि कॅलिपरचे मोफत वितरण शिबिराचे आयोजन दोन महिन्यांनंतर करण्यात येणार आहे.

शिबीराकरिता आतापर्यंत ८३० हून अधिक जणांची नोंदणी झाली आहे.  शिबिरात १ हजाराहून अधिक दिव्यांग येण्याची शक्यता आहे. संस्थेने नाशिक, नागपूर, शेगाव, औरंगाबाद, अकोला, वर्धा, मुंबई, इचलकरंजी, येवला, अमरावती, जालना, जळगाव आदी अनेक भागात शिबिरे घेतली आहेत.  त्यामध्ये तब्बल २१,४०० हून अधिक दिव्यांगांनी लाभ घेतला आहे. शिबिरात येणा-या रुग्णांच्या कुटुंबियांना मोफत भोजन, चहा, नाश्ता देण्यात येणार असल्याचे संस्थेचे माध्यम व जनसंपर्क संचालक भगवान प्रसाद गौड़ यांनी सांगितले.

रामा हॉस्पिटॅलिटी, यशस्वी ग्रुप, आॅल इंडिया अग्रवाल कॉन्फरन्स, राऊंड टेबल इंडिया, इंटरनॅशनल वैश्य फेडरेशन, लायन्स क्लब, रोटरी क्लब इंटरनॅशनल, जय शिवराय प्रतिष्ठान, विप्रा फाउंडेशन, येरवडा अग्रवाल समाज, अखिल भारतीय कृषी गौ सेवा स्वयंसेवक संघ , विश्वकर्मा वंशीय समाज संघटना महाराष्ट्र राज्य, अग्रवाल संघटना विश्रांतवाडी, ओम महावीर सोसायटी येरवडा, पिंपरी चिंचवड जैन महासंघ, श्री गोद्वार सिरवी क्षत्रिय समाज, समस्त राजस्थानी समाज संघ, रोटरी क्लब आॅफ डायनॅमिक भोसरी, क्वालिटी पेंट्स, निर्मला घुले प्रतिष्ठान, न्यू आर्य फाउंडेशन, श्री आरोग्य लक्ष्मी क्लिनिक आयुर्वेद आणि पंचकर्म केंद्र, अक्षय विकास प्रतिष्ठान, भगवान परशुराम जनसेवा समिती, श्री सारस्वत समाज ट्रस्ट यासह ३० हून अधिक संस्था या उपक्रमाशी संलग्न असणार आहेत.
 
शिबिरात सहभागी होऊ इच्छिणा-या दिव्यांगांनी आपले आधारकार्ड, अपंगत्वाचे प्रमाणपत्र व अपंगत्व दर्शविणारी दोन छायाचित्रे सोबत आणावीत.  शिबिरासंदर्भात अधिक माहितीसाठी संस्थेच्या हेल्पलाइन क्रमांक ७०२३५०९९९९ वर संपर्क साधावा.

नारायण सेवा संस्थानविषयी :-
नारायण सेवा संस्था १९८५ पासून नर सेवा-नारायण सेवा या भावनेने कार्य करत आहे. संस्थापक कैलास मानव यांना राष्ट्रपतींच्या हस्ते मानवसेवेसाठी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. संस्थेचे अध्यक्ष प्रशांत अग्रवाल यांनी अपंगांसाठी वैद्यकीय, शिक्षण, कौशल्य विकास आणि क्रीडा अकादमीच्या माध्यमातून लाखो अपंगांना मानसिक, शारीरिक आणि आर्थिकदृष्ट्या बळकट करून समाजाच्या मुख्य प्रवाहात आणले आहे.  अग्रवाल यांना २०२३ मध्ये राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.  संस्थेने आतापर्यंत ४१,२०० हून अधिक कृत्रिम अवयव बसवले आहेत. महाराष्ट्रातील दिव्यांगांना मोफत कृत्रिम अवयव देऊन त्यांचे रखडलेले जीवन पुन्हा सुरू करण्यासाठी संस्था आता मोठ्या प्रमाणावर काम करणार आहे.
   
अधिक माहितीसाठी संपर्क
भगवान प्रसाद गौड़ (मो. ९८२९५६१९२६)

Post a Comment

0 Comments