Type Here to Get Search Results !

Add 1 BY 4 1200 PX By 300 PX

पुणे तिथे काहीही उणे ; पुण्यात रिकवरी वाल्यांची भर रस्त्यात दहशत ; गाडी उचलुन फुल हार्ड रिकवरी योव मनत रस्त्यावर जोरात बोंबा बोंब ; दुचाकीवर दुचाकी घेऊन जातानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल...


पुणे तिथे काहीही उणे ; पुण्यात रिकवरी वाल्यांची भर रस्त्यात दहशत ; गाडी उचलुन फुल हार्ड रिकवरी योव मनत रस्त्यावर जोरात बोंबा बोंब ; दुचाकीवर दुचाकी घेऊन जातानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल...


रिकवरी करणारे घेत आहेत पोलिसांची आणि गुन्हेगारांची साथ.

पुणे :- शहरात काही दिवसांपूर्वीच गुन्हेगारांना कायद्यात राहण्यासाठी पुणे पोलीस आयुक्तांनी थेट पोलीस आयुक्तालयातच परेड काढली. त्यानंतर शहरात गुन्हेगारी काही प्रमाणात कमी झाल्याचे वातावरण देखील झाले. त्यानंतर व बेकायदेशीर धंदे देखील बंद पाडण्यात आले.परंतु सगळच होत असताना मात्र रिकवरी वाल्यांना पोलीस आयुक्तांची काहीच भीती नसल्याचे वातावरण सध्या पुण्यात पाहायला मिळाले. पुण्यातील क्लासिक रिकव्हरी एजन्सी च्या गुंडगिरी करणारे कर्मचाऱ्यांनी एका नागरिकाला रस्त्यावर मारहाण करून गाडी उचलून थेट त्यांच्या गाडीवरती टाकून शहरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. अक्षरशः गाडी उचलल्यानंतर त्यांनी गाडी मालकाला देखील अतिशय नाहक मारहाण केल्याचं चित्र आहे. त्याच सोबतीला गाडी उचलल्यानंतर गाडीवर गाडी टाकून ज्यावेळेस नेत होते त्यावेळेस याचा व्हिडिओ देखील बनवण्यात आला आणि त्यामध्ये जोर जोरात ओरडत " फुल हार्ड रिकवरी यो"  म्हणत बोंबा बोंब केल्याचे पाहायला मिळाले. 
                     👇👇 पहा व्हिडिओ 👇👇


नाना पेठेतील गुन्हेगारांसोबत जिगरी मैत्री असल्याने नाना पेठेतील गुन्हेगारामुळे या रिकवरी करणाऱ्यांची दहशत वाढली आहे. तर पुणे शहर पोलीस मधील काही कर्मचारी आणि अधिकारी रिकवरी वाल्यांना पाठीशी घालत असल्याचे देखील चित्र पाहायला मिळत आहे. हे रिकवरी एजन्सी मध्ये काम करत असलेले मुलं यांच्यावर अनेक गंभीर गुन्हे असल्याचे देखील समजत आहे. तर या रिकवरी करणाऱ्यांना स्थानिक पोलीस मदत करत असल्याचे त्यांच्याच तोंडून ऐकायला मिळाले आहे. ज्यावेळी एखाद्याची गाडी नियमाच्या पलीकडे रिकव्हरी केली जाते त्यावेळेस तक्रारदार पोलीस ठाण्यात जातो आणि संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यासाठी सांगतो परंतु पोलीस त्यांची समजुत काढून काहीतरी बोलून त्याला परत माघारी पाठवून,आपण ज्याचे मिठ खाल्लं आहे त्याला मदत केल्याचे दाखवून देत आहे. गुलटेकडी सॅलेसबरी पार्क येथील रिकवरी करणारा एंजट दिपक शिंदे हा क्लासिक इंटरप्रायजेस नावाची प्रशस्त दुकान थाटून आपलं वर्चस्व प्रस्थापित करत आहे. तर छोट्या छोट्या टपोरी गॅंगला हाताशी धरून रिकवरी करत आहे. तर रिकवरी करणारी टपोरी गॅंग नागरिकांना मारहाण, दमदाटी, शिवीगाळ करत जबरण गाड्या उचलत असल्याचे पाहायला मिळत आहे. तर एखाद्या व्यक्ती त्यांना जड जात असल्यास नाना पेठेतील काही गुंडांचे नाव घेऊन लोकांना भिती दाखवून पैसे वसूली करत आहे.
गुंडगिरी झाली, पुण्यात दहशत कमी झाली, पण रिकवरी वाल्यांना काहीच पोलिस आयुक्तांची भीती नाही? पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी पुण्यातील रिकवरी करणाऱ्या दिपक शिंदेची कुंडली काढून, त्याच्या चिल्लर गॅंगवर कडक कारवाई करून पुण्यातून हद्द पार करावे. अशी मागणी दलित पँथर ऑफ इंडियाचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष इलियास शेख यांनी पोलिस आयुक्तांना पत्राद्वारे मागणी केली आहे.

एका फायनान्स कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून गाडी उचलताना नियमाची माहिती घेतली असता काय म्हणाले ते ?
● रेपो किट भरून घेऊन कस्टमरची सही घेणे अनिवार्य आहे.
● रिकव्हरी करणारे कर्मचारी कृपया संबंधित पोलिस स्टेशनला सूचना देने अनिवार्य आहे.
● जो रिकव्हरी साठी येणार आहे त्याच्या नावाने माहिती अगोदर नोटीस द्वारे देने अनिवार्य आहे.
●  जो रिकव्हरी साठी येणार आहे त्याच्याकडे आय डी कार्ड, नोटीस कॉपी असणे आवश्यक आहे.

यापैकी एकही नियम रिकव्हरीवाले पाळत नसल्याचे निदर्शनास आले आहे.

लवकरच टाईम्स ऑफ महाराष्ट्र पुणे शहरातील कोण कोणते पोलीस यांना मदत करत आहेत त्यांची नावे जाहीर करणार आहोत.



Post a Comment

0 Comments