पुणे : पुणे कार अपघात प्रकरणी पोलिसांनी अल्पवयीन आरोपीच्या वडिलांसह चौघांना अटक झाली आहे. विशाल अग्रवाल यांना बुधवारी न्यायालयात हजर केलं जाणार आहे. विशाल अग्रवाल यांना छत्रपती संभाजीनगरमधून ताब्यात घेण्यात आलं होतं.
रविवारी पहाटे झालेल्या अपघातात तरुण आणि तरुणीचा जागीच मृत्यू झाला होता. JJB न्यायालयाने अल्पवयीन आरोपीला जामीन देताना त्याला ३०० शब्दांचा निबंध लिहिण्याची आणि १५ दिवस ट्राफिक पोलिसांसोबत काम करण्याची अट ठेवलीय.
विशाल अग्रवाल हे पुण्यातील मोठे बिल्डर आहेत. त्यांच्या कंपनीची सुरुवात विशाल यांचे पणजोबा ब्रह्मदत्त अग्रवाल यांनी केली होती. विशाल अग्रवाल यांनी कंपनीची सूत्रे हाती घेतल्यानंतर बरीच प्रगती केली होती. ब्रह्मा कॉर्पचे पुण्यात वडगांव शेरी, खराडी आणि विमान नगर परिसरात अनेक मोठे प्रोजेक्ट सुरू आहेत. या कंपनीची संपत्ती ६०१ कोटी रुपये इतकी आहे. विशाल यांच्या कंपनीने शेरेटन ग्रँड, रेसिडन्सी क्लब सारख्या मोठ्या इमारती बांधल्या आहेत. याशिवाय अग्रवाल कुटुंबियांचे ब्रह्मा मल्टिस्पेस, ब्रह्मा मल्टिकॉनसुद्धा असून त्यांनी शहरात फाइव्ह स्टार हॉटेल्स बांधली आहेत.
विशाल अग्रवाल यांच्यावरही गुन्हा
पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणी विशाल अग्रवाल यांच्यावर कलम ७५ आणि ७७ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. त्यांना बुधवारी न्यायालयात हजर केलं जाणार आहे. मुलाकडे वाहन चालवण्याचा परवाना नाही हे माहिती असतानाही त्यांनी कार दिल्यानं त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
Post a Comment
0 Comments