Type Here to Get Search Results !

Add 1 BY 4 1200 PX By 300 PX

टक्क्याचा फटका कोणाला ? मोहोळ, आढळराव, बारणे, वाघेरे यांचे भवितव्य सील...

टक्क्याचा फटका कोणाला ? मोहोळ, आढळराव, बारणे, वाघेरे यांचे भवितव्य सील...

पुणे : पुणे जिल्ह्यातील तीन मतदारसंघांमध्ये सोमवारी अत्यंत चुरशीने पण शांततेत मतदान झाले. मतदानाचा टक्का काहीसा घसरला असला तरी त्याचा फटका नेमका कोणाला बसणार याचा अंदाज रात्री उशिरापर्यंत चौका चौकात सुरू होता.

पुणे, शिरूर आणि मावळ लोकसभा मतदारसंघात अनुक्रमे ५०.३२, ५१.४६ आणि ५२.९० टक्के मतदान झाले. पुणे जिल्ह्यातील तीनही लढती विलक्षण चुरशीच्या होतील, असे आडाखे मांडले जात होते. त्याप्रमाणे चुरशीने पण शांततेत मतदान पार पडले.

पुणे लोकसभा मतदारसंघात 'महायुती'चे मुरलीधर मोहोळ आणि 'महाआघाडी'चे रवींद्र धंगेकर यांच्यात प्रमुख लढत आहे. तर शिरूरमध्ये 'महायुती' चे शिवाजीराव आढळराव पाटील आणि महाआघाडीचे डॉ. अमोल कोल्हे हे निवडणूक रिंगणात आहेत. मावळ लोकसभा मतदार संघामध्ये 'महायुती'चे श्रीरंग बारणे आणि 'महाआघाडी'चे संजोग वाघेरे हे एकमेकांपुढे आव्हान म्हणून उभे ठाकले आहेत.


हे दावे आणि प्रति दावे यांची तुलना करण्यासाठी आता दि. ४ जून पर्यंत वाट पहावी लागणार आहे. दरम्यान, मोहोळ, धंगेकर, आढळराव, डॉ. कोल्हे, बारणे तसेच वाघेरे यांचे भवितव्य मतदार यंत्रामध्ये बंदिस्त झाले आहे.


लोकसभा मतदारसंघ मतदान टक्केवारी


पुणे ५०.३२%


कसबा पेठ ५७.९०


कोथरूड ४९.१०


पर्वती ४६.८०


पुणे कॅन्टोन्मेंट ५०.५२


शिवाजीनगर ४९.७२


वडगाव शेरी ४९.७१


मावळ ५२.९०%

चिंचवड ४९.४३


कर्जत ६०.१२


मावळ ५३.०२


पनवेल ४९.२१


पिंपरी ४८.२५


उरण ६४.७५


शिरूर ५१.४६%


आंबेगाव ६१.००


भोसरी ४६.२१


हडपसर ४५.३६


जुन्नर ५६.३५


खेड आळंदी ५५.२९


शिरूर ५३.०५

Post a Comment

0 Comments