Type Here to Get Search Results !

Add 1 BY 4 1200 PX By 300 PX

हजारो मतदारांची नावे यादीतून गायब...

हजारो मतदारांची नावे यादीतून गायब...

पुणे : कसब्यातील रहिवासी वैभव गांधी तावातावाने बोलत होते. आश्चर्य म्हणजे त्यांच्या पत्नीचे नाव मतदार यादीत; मात्र गांधी यांचेच नाव गायब झालेले, त्यांचा अधिकाऱ्यांशी वादही झाला.

परंतु त्यांना मतदान करता आले नाही. त्यामुळे ते संतप्त झाले होते. गांधी यांच्या सारखी हजारो उदाहरणे सोमवारी पुण्यात दिसून आली. त्याचे कारण होते सदोष मतदारयाद्या. 

गांधी यांना मतदान करता आले नाही, त्यामुळे 'सकाळ' कार्यालयात येऊन त्यांनी त्यांचे म्हणणे मांडले. निवडणूक आयोगाचे ओळखपत्र हे शोभेचे ठरले आहे, अशीही प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. हेरंब रहाळकर यांनाही असाच अनुभव आला. त्यांच्या ८५ वर्षांच्या आईचे मतदारयादीत नाव कायम होते. यंदाच ते वगळले गेले, त्याबद्दल रहाळकर चिडले. 

सहकारनगरमधील दीपक मुनोत यांच्याकडेही निवडणूक आयोगाचे ओळखपत्र आहे. अनेक निवडणुकांत त्यांनी मतदान केले. परंतु यंदा त्यांचे नाव गायब झाल्याचे दिसून आले. ताडीवाला रस्ता परिसरात राहणारे अल्ताफ नदाफ यांच्या कुटुंबातील सहा जणांची, तर मीना शेडगे यांच्याही कुटुंबातील सर्वांची नावे गायब झाल्याचे दिसून आले. त्याच परिसरात राहणाऱ्या वनिता बनसोडे यांच्या कुटुंबातील काही सदस्यांची नावे नसल्याचे दिसून आले. 

Post a Comment

0 Comments