Type Here to Get Search Results !

Add 1 BY 4 1200 PX By 300 PX

मुरलीधर मोहोळांचा गेम करून धंगेकरांना 'नाना' तऱ्हेने सेफ करणारा नेता कोण...

मुरलीधर मोहोळांचा गेम करून धंगेकरांना नाना तऱ्हेने सेफ करणारा नेता कोण...

पुणे : पुणे लोकसभा मतदारसंघातील प्रचंड ताकद असली तरीही; भाजप आणि मित्रपक्षाचे नेते गाफील न राहता, मते खेचण्यासाठी फिरत राहिले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुण्यात सभा घेतली; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह अनेक बड्या नेत्यांनी पुण्यात फेऱ्या वाढवून जुने (लोकसभा निवडणूक-२०१९) टिकवून, ते वाढविण्याची रणनीती आखली.

फडणवीसांनी पक्षातील आजी-माजी आमदार, खासदारांना 'टार्गेट' दिल्याचे बोलले जात आहे. त्याचवेळी महापालिकेतील १०३ माजी नगरसेवकांवर बारीक लक्ष असल्याचे सांगून झटून काम करण्याची एकप्रकारे दमबाजीच केली. तरीही, भाजपमधील एका बड्या नेत्याने पक्षाचे उमेदवार मुरलीधर मोहोळांचे काम केले नसल्याचा सूर आहे.

गंभीर बाब म्हणजे या नेत्याने मनापासून काम तर केले नाहीच; त्यापलीकडे जाऊन आपला शब्द पाळणाऱ्या २०-२२ माजी नगरसेवकांनाही मोहोळांचे काम न करण्याची ताकदी दिल्याचेही आता उघड-उघड सांगितले जात आहे. मात्र, फडणवीसांच्या राजकारणाची 'स्टाइल' ठाऊक असलेल्या काही माजी नगरसेवकांनी या नेत्याला न जुमानता मोहोळांसाठी झटल्याचेही लपून राहिलेले नाही. भाजपकडून लोकसभा लढण्यासाठी इच्छुक असलेल्या; परंतु तिकिट मिळालेल्या या नेत्याने मोहोळांऐवजी कॉंग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकरांनाच 'छुपा' सपोर्ट केल्याचे दिसत आहे. खुद्द फडणवीस यांच्यासह पक्षातील साऱ्याच बड्या नेत्यांनी या नेत्याची नाराजी दूर केल्याची चर्चा होती. मात्र, नेतृत्वाची पाठ फिरताच या नेत्याने आपल्याला हवे तसे काम केल्याचे काही माजी नगरसेवक सांगत आहेत.

Post a Comment

0 Comments