Type Here to Get Search Results !

Add 1 BY 4 1200 PX By 300 PX

बापट यांचे कार्यालय‌ कुणी फोडले होते? सुनिल केदारांचा मुरलीधर मोहोळ यांना प्रश्ण...

बापट यांचे कार्यालय‌ कुणी फोडले होते? सुनिल केदारांचा मुरलीधर मोहोळ यांना प्रश्ण...

पुणे : पुण्याचे दिवंगत खासदार गिरीष बापट यांचे कार्यालय आणि भाजपचे पक्ष कार्यालय जून २००७ मध्ये कुणी फोडले होते ? असा सवाल उपस्थित करत माजी क्रीडा मंत्री सुनिल केदार यांनी भाजप महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्यावर टीका केली. पुण्याचा खासदार हा बापट‌ यांचा वारसदार म्हणून दिल्लीत जाणार आहे. त्यामुळे तो सुसंस्कृत व पुणेकरांचे हित‌ जपणारा हवा, असेही केदार म्हणाले. पुण्याच्या विकासाच्या गप्पा मारणाऱ्यांनी काल झालेल्या पावसात पुण्यातील रस्ते जलमय का झाले, याचे उत्तर द्यावे, असे आव्हानही केदार यांनी दिले.

पुणे लोकसभा मतदार संघाचे काँग्रेस महाविकास आघाडी व इंडिया फ्रंटचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ पुणे श्रमिक पत्रकार संघात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत‌ केदार बोलत होते. यावेळी माजी आमदार उल्हास पवार उपस्थित होते.केदार म्हणाले, ''पुण्यात काल जो पाऊस झाला. तेव्हा शहरातील रस्ते जलमय झालेले पाहिले. त्यावेळी वेगवेगळ्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पाहणारे आणि पुण्याच्या विकासाच्या गप्पा मारणारे आठवले. त्यांनी केलेला विकास कुठे शोधू असा प्रश्न पडला. पुण्याच्या नदीची वाट लावली आहे. जून २००७ साली बापट व भाजप पक्षाचे कार्यालय कुणी फोडले ? बापट यांनी काय चुक केली होती? त्यावेळी कोणाचे फोटो खाली पडले होते? त्यामुळे पुण्यातील महायुतीच्या उमेदवाराला भाजपच्या‌ नावावर मते मागण्याचा अधिकार आहे का? याचा विचार होणे गरजेचे आहे. बापट शहरातील सर्व जाती धर्मातील लोकांना सोबत घेवून जात होते. पुणे शहर अभ्यासू व विचारवंतांचे आहे. या शहराला टिळक फुलेंचा वारसा आहे. त्यामुळे पुणेकरांनी निवडलेला खासदार कोण आहे ? हे दिल्लीत पाहिले जाणार आहेत.


Post a Comment

0 Comments