Type Here to Get Search Results !

आता कफन बांधलेला बंडखोर अमोल कोल्हे बघाल; अमोल कोल्हेंनी अजित पवारांना दिले थेट आव्हान...

आता कफन बांधलेला बंडखोर अमोल कोल्हे बघाल; अमोल कोल्हेंनी अजित पवारांना दिले थेट आव्हान...

पुणे : विधानसभा बाकी आहे, करारा जबाब मिलेगा. आतापर्यंत आज्ञाधारक अमोल कोल्हे बघितला, आता कफन बांधलेला बंडखोर अमोल कोल्हे बघाल, असे थेट आव्हान महाविकास आघाडीचे शिरूर येथील उमेदवार अमोल कोल्हे यांनी अजित पवारांना दिले आहे.

शिवसिंहाची औलाद आहे, थांबणार नाही, असेही ते म्हणाले. जेव्हा एक भूमिका घ्यायची वेळ आली होती, तेव्हा स्वार्थासाठी सरपटणाऱ्यांच्या रांगेत जायचे नाही हे आपण ठरवले होते, असेही कोल्हे म्हणाले.

दादा आपसे बैर नहीं, लेकीन बीजेपी की खैर नही, असेही कोल्हे यांनी सांगितले. भाजपने आमचा अपेक्षाभंग केला त्यांची तळी तुम्ही उचलत आहात, असेही कोल्हे यांनी अजित पवार यांना सुनावले. राज्याच्या उपमुख्यमंत्र्याला माझ्या मतदारसंघात १२ सभा घ्याव्या लागत असतील तर हा माझा गौरव आहे. माझे काम बोलते, म्हणून त्यांना इथे यावे लागले. दादांना आपण विनम्रतेने सांगत आहोत, मांजर सुद्धा कोंडून मारायचा प्रयत्न केला, तर तो प्रतिहल्ला करते. मी तर शिवसिंहाची औलाद आहे, थांबणार नाही, अजून विधानसभा बाकी आहे करारा जबाब मिलेगा.


Post a Comment

0 Comments