Type Here to Get Search Results !

Add 1 BY 4 1200 PX By 300 PX

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस महासंचालकांकडून आढावा...

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस महासंचालकांकडून आढावा...

पुणे : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी शहर आणि जिल्ह्यातील पोलिस बंदोबस्ताचा आढावा घेतला. पुणे, शिरूर आणि मावळ लोकसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया निष्पक्ष आणि शांततेत पार पाडावी, यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

पुणे पोलिस आयुक्त कार्यालयात पोलिस महासंचालक शुक्ला यांच्या उपस्थितीत शुक्रवारी (ता. १०) दुपारी आढावा बैठक पार पडली. अतिरिक्त पोलिस महासंचालक (कायदा आणि सुव्यवस्था) संजय सक्सेना, पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार, पिंपरी चिंचवडचे पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे, पुणे शहरचे पोलिस सहआयुक्त प्रवीण पवार, अतिरिक्त पोलिस आयुक्त अरविंद चावरिया, शैलेश बलकवडे, मनोज पाटील, पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक पंकज देशमुख आदी वरिष्ठ अधिकारी या वेळी उपस्थित होते.

पुणे, मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघाचे मतदान सोमवारी (ता. १३) रोजी होणार आहे. या मतदान प्रक्रियेदरम्यान कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलिस महासंचालक शुक्ला यांनी पुणे, पिंपरी चिंचवड शहर आणि जिल्ह्यातील उपाययोजनांचा आढावा घेतला. तसेच, आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याबाबत सूचना दिल्या. सराईत गुन्हेगारांविरुद्ध कारवाई करण्यात यावी.

Post a Comment

0 Comments