Type Here to Get Search Results !

क्रिकेट खेळताना गुंप्तांगावर मार लागल्याने चिमुकल्याचा मृत्यू...

क्रिकेट खेळताना गुंप्तांगावर मार लागल्याने चिमुकल्याचा मृत्यू...

पुणे : खेळताना गुप्तांगावर बॉल लागल्याने चिमुरड्याचा मृत्यू झाला आहे. ही घटना पुण्यातून समोर आली आहे. पुण्यातील लोहगाव भागात ही धक्कादायक घटना घडली आहे.

शौर्य ऊर्फ शंभू कालिदास खांदवे, असं मृत्यू झालेल्या ११ वर्षीय मुलाचं नाव आहे. परिसरामध्ये या मुलाच्या मृत्युमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेमुळे शंभुच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. अशा घटना घडू शकतात, त्यामुळे खेळताना काळजी घेणं गरजेचं असतं. 

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना गुरुवारी पुण्यातील लोहगाव भागात घडली आहे. शंभू हा शाळेला उन्हाळी सुट्या असल्यामुळे गुरुवारी संध्याकाळी त्याच्या मित्रांसोबत क्रिकेट खेळत होता. मित्रांसोबत खेळता खेळता अचानक समोरून येणारा बॉल शंभुच्या गुप्तांगावर लागला आणि तो मैदानावर कोसळला. 

काही वेळानंतर तो उठून उभा राहिला. मात्र , वेदना असह्य झाल्यामुळे तो परत मैदानावर पडला. तो खाली पडताच त्याच्या मित्रांनी आरडाओरडा केला. तिथे असलेल्या नागरिकांनी शंभूला खाजगी रुग्णालयात दाखल केलं. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर शंभूला मृत घोषित करण्यात आलं आहे. याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

Post a Comment

0 Comments